Video: लंडनच्या टॉवर ब्रीजवर सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकरचा अफलातून डान्स

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर डान्सचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'तमाशा लाईव्ह'मधील रंग लागला या गाण्यावर सोनाली आणि फुलवाने डान्स केला आहे. ब्रिजवर लोकांची ये-जा असतानाही अत्यंत आत्मविश्वासाने दोघींनी हा डान्स केल्याने नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

Video: लंडनच्या टॉवर ब्रीजवर सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकरचा अफलातून डान्स
Sonalee KulkarniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 12:40 PM

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा (Tamasha Live) सांगीतिक नजराणा येत्या 15 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच हिट ठरली असून त्यावर इन्स्टा रिल्स व्हायरल होत आहेत. हल्ली चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विविध युक्त्या अमलात आणल्या जातात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) नुकतंच लंडनमधील प्रसिद्ध टॉवर ब्रिजवर कोरिओग्राफर फुलवा खामकरसोबत (Phulawa Khamkar) अफलातून डान्स केला. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर डान्सचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘तमाशा लाईव्ह’मधील रंग लागला या गाण्यावर सोनाली आणि फुलवाने डान्स केला आहे. ब्रिजवर लोकांची ये-जा असतानाही अत्यंत आत्मविश्वासाने दोघींनी हा डान्स केल्याने नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

ग्रेट, कमाल आहात तुम्ही, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने कमेंट केलं. तर मागून येणारे-जाणारे लोकसुद्धा भारतीयच वाटू लागलेत, असं दुसऱ्याने म्हटलं. आता तुमची जादू सातासमुद्रापार, असंही एकाने लिहिलं. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी ‘चित्रपटाची नांदी’ हे पहिलं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता इतरही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. बातमीची वारी, फड लागलाय, वाघ आला, लाथ घालणार, रंग लागला, कडकलक्ष्मी, गरमा गरम घ्या, झुंज लागली, वासुदेव, जाऊ कशी माघारी, जखम जहरी, गंमत गड्या अशा अनेक गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

अमितराज व पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. प्रत्येक पात्राची ओळख ही गाण्याच्या माध्यमातून होत असून अशा प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच होत आहे. विशेष म्हणजे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे  ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गायले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटात काही विशिष्ट शैलीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. रॅप, रोमँटिक असे गाण्यांचे विविध प्रकार यात असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.