Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coffee | थोडीशी गोड अन् थोडी कडू…सिद्धार्थ-कश्यपसोबत स्पृहा जोशीची टेस्टी ‘कॅाफी’!

गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी रसिकांसाठी लज्जतदार 'कॅाफी' घेऊन आली आहे. तिच्या जोडीला आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परुळेकर... त्यामुळं प्रत्येकालाच या 'कॅाफी'ची चव चाखण्याचा मोह नक्कीच होणार आहे.

Coffee | थोडीशी गोड अन् थोडी कडू...सिद्धार्थ-कश्यपसोबत स्पृहा जोशीची टेस्टी 'कॅाफी'!
Coffee
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 8:00 AM

मुंबई : जिच्या केवळ सुगंधानंच मन प्रफुल्लीत होतं, शरीराला आलेला थकवाही परागंदा होतो ती म्हणजे कॅाफी… पूर्वीपेक्षा आजच्या जनरेशनमध्ये कॅाफी वेगवेगळ्या कारणांमुळं पॅाप्युलर आहे. कॅाफीचा सुगंध, फेसाळता भलामोठा कॅाफी मग, मोठ्या कलाकुसरीनं त्यात चितारलं जाणारं बदामाचं पान-डिझाईन्स आणि जिवलग व्यक्तीचा सहवास… म्हणजे अर्थातच डेट असं काहीसं तरुणाईमध्ये कॅाफीचं समीकरण बनलं आहे. 14 जानेवारीला रसिकांना चित्रपटगृहांमध्ये असाच ‘कॅाफी’चा स्वाद चाखायला मिळणार आहे.

गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी रसिकांसाठी लज्जतदार ‘कॅाफी’ घेऊन आली आहे. तिच्या जोडीला आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परुळेकर… त्यामुळं प्रत्येकालाच या ‘कॅाफी’ची चव चाखण्याचा मोह नक्कीच होणार आहे.

प्रेम आणि कॅाफीचा सुखद संगम

‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘कॅाफी’ ची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांनी केली असून,  या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणारे नितीन यावेळी प्रेक्षकांसाठी लज्जतदार ‘कॅाफी’ घेऊन आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेम आणि कॅाफीचा सुखद संगम या चित्रपटाच्या निमित्तानं घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

इट्स अ स्टोरी ऑफ लव्ह!

कॅाफी जशी थोडी गोड, थोडी कडवट असते तशीच लव्हस्टोरीही असते. प्रेमाची अनुभूती झाल्यावर येणारी जवळीक, एकमेकांची ओढ, तास न तास चालणाऱ्या गप्पा, एकमेकांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रेमाची गोड बाजू मानली, तर द्विधा मन:स्थिती, छोटया मोठया कुरबुरी आणि प्रेमातील अडथळ्यांसारख्या कडवट बाजूही अनुभवायला मिळतात. याच कारणांमुळं ‘कॅाफी’ हा चित्रपट आजवर पाहिलेल्या प्रेमकथांपेक्षा एक वेगळी लव्हस्टोरी सांगणारा ठरणार आहे. त्यामुळंच ‘इट्स नॅाट अ लव्ह स्टोरी… इट्स अ स्टोरी ऑफ लव्ह…’ असं ‘कॉफ़ी’ चित्रपटाचं वर्णन सार्थ ठरेल.

या चित्रपटात उत्साही, हरहुन्नरी आणि नेहमी प्रसन्न असणारा सिद्धार्थ दिसेल. कश्यपनं साकारलेल्या कॅरेक्टरचा स्वभाव मात्र काहीसा गंभीर आणि समजूतदार असल्याचं पहायला मिळेल. या दोघांना सांभाळून घेणारी लव्हेबल स्पृहा या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांनी लिहीली असून, मच्छिंद्र यांनीच नितीन यांच्या साथीनं संवादलेखनही केलं आहे. नितीन यांनी अशोक बागवे यांच्यासोबत या चित्रपटासाठी गीतलेखनही केलं असून, त्यांना तृप्ती चव्हाण यांनी संगीतसाज चढवला आहे. आय. गिरीधरन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, तर संकलन राहुल भातणकर यांचं आहे. हरिश आईर यांनी कलादिग्दर्शनाची, तर संजय कांबळे यांनी कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी चोख बजावली आहे. 14 जानेवारीला या लज्जतदार कॉफीचा आस्वाद चित्रपटगृहांत घेता येणार आहे.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.