Subodh Bhave: “माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्याआधी..”, सुबोध भावेनं पोस्ट केला संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ

पुण्यातील (Pune) एका शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात (Speech) सुबोध भावेनं विविध मुद्द्यांचा उल्लेख केला.

Subodh Bhave: माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्याआधी.., सुबोध भावेनं पोस्ट केला संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ
सुबोध भावेनं पोस्ट केला संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 5:39 PM

“आज आपण देश उभारण्याचं काम, ज्यांची लायकी नाही अशा राजकारण्यांच्या माथी सोपवून आपण मोकळे झालोत,” या अभिनेता सुबोध भावेच्या (Subodh Bhave) वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पुण्यातील (Pune) एका शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात (Speech) सुबोध भावेनं विविध मुद्द्यांचा उल्लेख केला. राष्ट्रीय शिक्षण, मुलांवरील संस्कार, राजकारण, राष्ट्रपुरुषांचं काम या सर्व मुद्द्यांवर तो व्यक्त झाला. सुबोधच्या या भाषणातील विविध मुद्द्यांची सोशल मीडियावर चर्चा होत असतानाच आता त्याने संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची,’ असं लिहित त्याने हा जवळपास 16 मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सुबोध भावेची पोस्ट-

‘नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे, त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ (कुठेही कट न करता जसाच्या तसा). आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा,’ अशी पोस्ट लिहित सुबोधने भाषणाचा जवळपास 16 मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या चर्चांमधील सुबोधच्या वक्तव्यांचा संदर्भ या व्हिडीओत पहायला मिळतो. राष्ट्रीय शिक्षण, राजकारण, मुलांवरील संस्कार यांवर तो नेमकं काय म्हणाल हे या भाषणात ऐकायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत सुबोधला पाठिंबा दिला आहे. ‘योग्य बोललात, चुकीचं काही नाही. बाकीचं चुकीचं चाललंय, चुकीला योग्य म्हणण्याच्या काळातून देश जातोय सध्या,’ असं एकाने लिहिलं. तर ‘कलाकारांनी व्यक्त व्हायलाच पाहिजे. तुम्ही जे बोललात ते बोलायला देखील खूप धाडस लागतं. सुबोध भावे तुमचं मनापासून अभिनंदन,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.