‘एलिझाबेथ कोण?’ प्रश्नाचं उत्तर अखेर समोर येणार! थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर ‘बळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी'च्‍या जागतिक रीलीजची घोषणा केली. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपट सृष्‍टीमधील सर्वात प्रख्‍यात कलाकार स्‍वप्‍नील जोशी, पूजा सावंत व समर्थ जाधव झळकणार आहेत.

‘एलिझाबेथ कोण?’ प्रश्नाचं उत्तर अखेर समोर येणार! थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Bali
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 1:40 PM

मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी’च्‍या जागतिक रीलीजची घोषणा केली. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपट सृष्‍टीमधील सर्वात प्रख्‍यात कलाकार स्‍वप्‍नील जोशी, पूजा सावंत व समर्थ जाधव झळकणार आहेत. प्रतिष्ठित चित्रपटनिर्माता विशाल फ्यूरिया यांचे दिग्‍दर्शन आणि अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार यांच्‍या ग्‍लोबल स्‍पोर्टस् एंटरटेन्‍मेंट अॅण्‍ड मीडिया सोल्‍यूशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडद्वारे निर्मित चित्रपट ‘बळी भारतामध्‍ये आणि जगभरातील 240 हून अधिक देश व प्रदेशांमध्‍ये 9 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज झाला आहे.

चित्रपट ‘बळी’ विधुर, मध्‍यमवर्गीय वडिल श्रीकांतचा (स्‍वप्‍नील जोशी) जीवनप्रवास दाखवतो. त्‍याचा 7 वर्षाचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) चक्‍कर येऊन पडतो आणि सविस्‍तर निदानासाठी त्‍याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्‍ये नेले जाते. येथून श्रीकांतच्‍या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळते. परीस्थितीला रोमांचक वळण मिळते, जेव्‍हा मंदार एका रहस्‍यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरूवात करतो. मंदार, ती परिचारिका हॉस्पिटलच्‍या पडक्‍या भागामध्‍ये राहत असल्‍याचा दावा करतो.

भारतातील हॉरर शैलीला पुनर्परिभाषित करण्‍याचा प्रयत्‍न!

प्रेक्षकांनी चित्रपट ‘छोरी’वर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहता आम्‍हाला विशाल फ्युरियासोबचा सहयोग सुरू ठेवण्‍यास आनंद होत आहे. ते भारतातील हॉरर शैलीला पुनर्परिभाषित करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. स्‍वप्‍नील जोशी, तसेच प्रतिभावान कलाकारांसह ‘बळी’ आमच्‍या झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रादेशिक भाषा कन्‍टेन्‍ट पोर्टफोलिओमध्‍ये अधिक मूल्‍याची भर करतो, असे Amazon Primeने म्हटले आहे.

दिग्‍दर्शक विशाल फ्युरिया म्‍हणाले की, ‘हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमधील प्रत्‍येक चित्रपटासह काहीतरी नवीन घेऊन येण्‍याचा माझा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. सर्वोत्तम भयपट म्‍हणजे मनावैज्ञानिकाशी संबंधित चित्रपट, जे वास्‍तविकतेपासून दूर असलेल्‍या पात्रांसाठी सहानुभूती निर्माण करतात. आपण जे पाहतो त्‍यावर जितका अधिक विश्‍वास ठेवू, ते तितके अधिक रोमांचक बनत जाते. हेच ‘बळी’च्‍या बाबतीत आहे. या चित्रपटामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत.’

मराठीतील हॉररपट!

हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेवून येतोय, याची खुणगाठ बांधण्यासाठी चित्रपटाचे पोस्टर पुरेसे ठरते. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेब सीरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

हेही वाचा :

Video | ‘याच्याशी लग्न करू नकोस…’, रणबीरचं ‘ते’ कृत्य पाहून संतापलेल्या चाहत्यांचा आलियाला सल्ला!

Video | चक्क लुंगी परिधान करून शॉपिंगला निघालीये उर्वशी रौतेला! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.