मुंबई : महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांनाही आता प्रेक्षकांची आस लागली असून लवकरच प्रेक्षक आता आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद थिएटरमध्ये बसून घेतील. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर होऊ लागल्या आहेत.
त्यापैकीच एक एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.
आपल्या पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कुठे दिसतील कोणत्या चित्रपटात कोणत्या माध्यमात दिसतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याला उत्तर म्हणजे सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट होय. मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं.
लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा जोमाने चित्रपटसृष्टी काम करू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘फ्री हिट दणका’ या नवीन चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाला सुनिल मगरे हे दिग्दर्शन तर संजय नवगिरे हे या चित्रपटाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन करणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर राजू दौलत जगताप तर संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत.
महिला सशक्त व्हायला हव्यात, गुन्हा घडण्यापूर्वी कायद्याची शिक्षेची भीती वाटायला हवी : अलका कुबल