स्कूल कॉलेज आणि लाईफ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रोहित शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

बाॅलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी हा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा आहे. विशेष म्हणजे रोहित शेट्टी याच्या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झालाय. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

स्कूल कॉलेज आणि लाईफ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रोहित शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 4:35 PM

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास तयार आहे. रोहित शेट्टी याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाईफ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे ट्रेलरही रिलीज करण्यात आले आहे. बिग बाॅस 15 (Bigg Boss 15) विजेती तेजस्वी प्रकाश ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश हिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आता या चित्रपटाचा ट्रेलर (Movie trailer) रिलीज झालाय. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय.

स्कूल कॉलेज आणि लाईफ या चित्रपटात स्कूल आणि काॅलेजचे आयुष्य कसे असते आणि त्यामध्ये इतर काय समस्या येतात हे दाखवण्यात आलंय. हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमधील क्रेझ वाढले आहे. या चित्रपटात तेजस्वी प्रकाश हिच्यासोबतच करण परब हा मुख्य भूमिकेत आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. या चित्रपटात रणवीर सिंह हा महत्वाच्या भूमिकेत होता. विशेष म्हणजे रणवीर सिंह याच्यासह रोहित शेट्टी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. सर्कस चित्रपटाची टिम कपिल शर्मा याच्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेली होती.

तेजस्वी प्रकाश ही देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बाॅस 15 जिंकल्यानंतर लगेचच एकता कपूर हिची मालिका नागिन हिच्यामध्ये काम करण्याची संधी तेजस्वी प्रकाश हिला मिळाली. विशेष म्हणजे या मालिकेने टीआरपीमध्येही धमाला केला. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, नागिन मालिका बंद होणार आहे. मात्र, अजूनही नागिन मालिकेचे शूटिंग सुरू आहे.

तेजस्वी प्रकाश ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. बिग बाॅसच्या घरात तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतरही करण आणि तेजस्वी एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा तेजस्वी प्रकाश हिला घेण्यासाठी करण हा नागिन मालिकेच्या सेटवर पोहचतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होती. यावर तेजस्वी प्रकाश हिने स्पष्टीकरण दिले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.