Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक

या चित्रपटाबद्दल (Dharmaveer) आणि प्रसाद ओकच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढलेली असतानाच आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या नावाचा उलगडा या कार्यक्रमात झाला.

Dharmaveer: 'धर्मवीर' चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता; पहा खास लूक
Prasad Oak and Eknath ShindeImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:02 PM

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारतोय. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम पार पडला. या चित्रपटाबद्दल आणि प्रसाद ओकच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढलेली असतानाच आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या नावाचा उलगडा या कार्यक्रमात झाला. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांना गुरुच नव्हे तर देव मानणारे आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते साकारणार आहे. प्रसाद ओकप्रमाणेच क्षितिज दातेचाही लूक एकदम हुबेहुब जुळून आला आहे हे विशेष. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत.

यावेळी प्रसाद ओक म्हणाला, “आपण या चित्रपटाच्या टीझरमध्ये एक फार सुंदर वाक्य ऐकलं ते म्हणजे, ‘सर्वच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे सुद्धा असतात’ लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केला त्याच भावनेने मंगेश देसाई यांनी आनंदोत्सव केला. आनंद मूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला आणि त्या मूर्तीला अतिशय सुरेख रूप दिलं आणि त्या मूर्तीमध्ये प्राण-प्रतिष्ठा केली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी. मी दिघे साहेब यांच्याबद्दल खूप वाचलं, ऐकलं. माझ्यासारख्या अभिनेत्याला 95 चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली याचा मला फार आनंद वाटत आहे. या चित्रपटात ज्या ज्या महारथींनी मला मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो.”

पहा फोटो-

लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले, “मी आजवर वेगवेगळे विषय असणारे चित्रपट बनवले. शेतकरी, अध्यात्म, इतिहास या विषयांचे चित्रपट बनवल्यानंतर जीवनपट बनवण्याचा विचार होता, पण कोणाच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवणार हा प्रश्न होता. धर्मवीर हा चित्रपट झी स्टुडिओज मार्फत लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध केला जाणार याचा मला फार आनंद होत आहे.” ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा:

Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले

KGF 2: “लोकांनी त्याला मूर्खपणा म्हटलं, पण..” केजीएफ 2ला मिळणारा प्रतिसाद पाहून यशने पोस्ट केला Video

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.