चिन्मय उद्गीरकर-सुरुची आडारकरच्या नात्यात तिसरी व्यक्ती, ‘A फक्त तूच’मध्ये आणखी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री!

टिकटॉक फेम आणि एक्स्प्रेशन क्वीन म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा ठाकरे (Shilpa Thakare) आता आगामी "A फक्त तूच" या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

चिन्मय उद्गीरकर-सुरुची आडारकरच्या नात्यात तिसरी व्यक्ती, ‘A फक्त तूच’मध्ये आणखी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री!
Shilpa Thakare
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 12:04 PM

मुंबई : टिकटॉक फेम आणि एक्स्प्रेशन क्वीन म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा ठाकरे (Shilpa Thakare) आता आगामी “A फक्त तूच” या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत अहमदनगर येथे संपन्न झाला.

जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत.चित्रपटाची पटकथा, संवाद प्रफुल एस. चरपे यांचे आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी  निभावली आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वांबुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत.

प्रेक्षकांच्या भेटीला रोमँटिक कथा

‘A फक्त तूच… कारण आपलं नातं वेगळं आहे’ असं नाव असलेल्या या चित्रपटाद्वारे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अहमदनगर आणि परिसरातल्या उत्तमोत्तम लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रित करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या वर्षात प्रेक्षकांना उत्तम कलाकृती पाहायला मिळणार आहे.

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर “A फक्त तूच” या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं होतं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.

पोस्टरही खास!

समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तर कारण आपलं नातं वेगळं आहे… ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

हेही वाचा :

Govinda Naam Mera | कतरिनासोबत लग्नाची तयारी, दुसरीकडे विकीचा फोटो शेअर करत कियारा म्हणतेय ‘आजकाल चर्चा आमच्या प्रेमाची…!’

Happy Birthday Amjad Khan | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, ‘शोले’चे ‘गब्बर सिंह’ बनून जगभरात गाजले अमजद खान!

Aai Kuthe Kay Karte | आशुतोष केळकर अरुंधतीला देणार नव्या म्युझिक अल्बमची ऑफर, संधीचं स्वीकारून ‘आई’ पुढे जाईल?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.