Timepass 3: “अशी पालवी जी फुटत नाय, फोडते”; टाईमपास 3 मध्ये हृता दुर्गुळेचा कधीही न पाहिलेला अंदाज

'आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,' असं कॅप्शन देत हृताने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

Timepass 3: अशी पालवी जी फुटत नाय, फोडते; टाईमपास 3 मध्ये हृता दुर्गुळेचा कधीही न पाहिलेला अंदाज
Timepass 3 Official Teaser Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 12:08 PM

रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ (Timepass 3) या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘टाईमपास’च्या सीरिजमधील या तिसऱ्या भागात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रथमेश परब (Prathamesh Parab) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,’ असं कॅप्शन देत हृताने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

‘लहानपणी टाईमपास म्हणून झालेल्या लव्हपासून लग्नाच्या लोच्यापर्यंतची स्टोरी सगळ्यांनी पाहिली. पण त्या प्रवासात अजून एक गोष्ट होती. जी सांगायची राहिलीच ना रे,’ अशा संवादाने या टीझरची सुरुवात होते. सुरुवातीला दगडू आणि प्राजक्ताची झलक दाखवल्यानंतर पालवीची धमाकेदार एण्ट्री होते. “आपन पालवी दिनकर पाटील, अशी पालवी जी फुटत नाय, फोडते,” अशा दमदार डायलॉगवर हृताच्या चेहऱ्यावर पडदा उचलण्यात येतो. “आपल्या दोस्ताला जो नडेल, त्याचा आपन मार्बल फोडेल”, “मनाचा डोअर ओपन ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून कसा येईल काही सांगता येत नाही”, असे एकापेक्षा एक भन्नाट डायलॉग या टीझरमध्ये ऐकायला मिळतात. या टीझरमध्येही शाकालचीही झलक पहायला मिळते.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

2014 मध्ये ‘टाईमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरने यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारल्या. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधवनेच केलं होतं. आता ‘टाईमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळतेय. या टीझरवर अनेकांनी कमेंट्स करत चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं म्हटलंय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.