‘फाईल नंबर 498 A’मध्ये आहे तरी काय?

गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाविश्वात (Marathi Film Industry) एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही चित्रपटांनी तर कोट्यवधींची कमाई केली.

'फाईल नंबर 498 A'मध्ये आहे तरी काय?
File no 498 AImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:37 AM

गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाविश्वात (Marathi Film Industry) एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही चित्रपटांनी तर कोट्यवधींची कमाई केली. ‘झिम्मा’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘चंद्रमुखी‘ या चित्रपटांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. आगामी काळातही मराठी चित्रपटसृष्टीत दमदार कथानक असलेले चित्रपट (Marathi Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेशी संबंधित किंवा कोर्टरूम ड्रामा प्रकारातील काही चित्रपट येऊन गेले. त्यात आता मल्हार गणेश दिग्दर्शित ‘फाईल नंबर- 498 A’ (File No 498 A) या आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची भर पडली आहे.

या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत ‘फाईल नंबर – 498 A’ या चित्रपटाची कथा श्रीधर शंकर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर शंकर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे.

स्वप्नील प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून कायद्यातील 498 A या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये कोर्टरूम ड्रामा सादर झाला असला, तरी ‘फाईल नंबर- 498 A’ हा चित्रपट अधिक वेगळ्या पद्धतीनं सादर होणार आहे. पोस्टरवर मागणारे हात आणि मंगळसूत्रात बांधलेले हात, पार्श्वभूमीवर उडणारी कबुतरं दिसत असल्यानं स्वातंत्र्य, बंधनं या बाबतची मांडणी चित्रपटात असेल असा अंदाज आपल्याला करता येतो. चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी असून,चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.