Pradeep Patwardhan: ‘मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं’, प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर शोक व्यक्त

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला. मुंबईतील गिरगाव (Girgaon) इथल्या राहत्या घरी त्यांचं आज सकाळी (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Pradeep Patwardhan: 'मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं', प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर शोक व्यक्त
प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर शोक व्यक्त Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 10:58 AM

अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला. मुंबईतील गिरगाव (Girgaon) इथल्या राहत्या घरी त्यांचं आज सकाळी (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीसुद्धा ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ‘मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट-

जितेंद्र आव्हाड-

‘मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज दुःखद निधन झाले. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी कलासृष्टीने एका उत्तम कलाकाराला गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

सचिन सावंत-

‘मराठी रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन चटका लावणारे आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या अभिनयाने माझ्यासारख्या तमाम रसिकांचे मनोरंजन झाले. मोरुची मावशी ते मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं,’ अशा शब्दांत सचिन सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली.

चंद्रकांत पाटील-

‘सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मोरूची मावशी असो वा कॉमेडीची बुलेट ट्रेन; त्यांचा अभिनय बघणं हा नेहमीच मन प्रसन्न करणारा अनुभव असायचा. मराठी रसिकमनांत त्यांचं स्थान अढळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’

अमोल कोल्हे-

‘आपल्या अभिनयाने मराठी रसिक मनाला अनेक दशकं भुरळ घालणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

रेणुका शहाणे-

प्रदीप पटवर्धन यांचे अनेक सिनेमे गाजले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा या सिनेमांनी तर लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मोरूची मावशी नाटक नाट्यरसिकांना खेचून तिकीटबारीवर खेचून आणलं. तर हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अशा या अवलियाचं अकाली जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.