‘मला चित्रपटात पुरुषाची भूमिका करायचीय’; सई ताम्हणकरने सांगितला तिचा ड्रीम रोल

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते मात्रं भविष्यात तिला कोणती भूमिका करायला आवडेल असं विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर चकित करणारं आहे. कारण सईला पुरुषाची भूमिका करायची आहे.

'मला चित्रपटात पुरुषाची भूमिका करायचीय'; सई ताम्हणकरने सांगितला तिचा ड्रीम रोल
Sai TamhankarImage Credit source: Sai Tamhankar Instagram
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:14 AM

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते मात्रं भविष्यात तिला कोणती भूमिका करायला आवडेल असं विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर चकित करणारं आहे. कारण सईला पुरुषाची भूमिका करायची आहे. ‘मित्रम्हणे’ या पॉडकास्टवर बोलताना सईने आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. सईचा ‘पाँडीचेरी’ हा सिनेमा (Pondicherry Marathi Movie) नुकताच प्रदर्शित झाला आहे. स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा ‘पाँडीचेरी’ हा भारतातील पहिला मराठी चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. त्या निमित्ताने सईने मित्रम्हणे या मराठी पॉडकास्ट (Marathi Podcast) शोवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी बोलताना तिने आपल्याला पुरुषाची भूमिका करायला आवडेल असं सांगितलं. तसेच ऐतिहासिक चित्रपटात देखील एखादी चांगली भूमिका करायची इच्छा यावेळी सईने व्यक्त केली.

पाँडीचेरीमध्ये सई ताम्हणकरने साकारलेल्या भूमिकेचं देखील कौतुक केलं जात आहे. या सिनेमात ती मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलली आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ‘पाँडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.

कसा आहे पाँडीचेरी चित्रपट?

सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.” तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ”माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले.”

इतर बातम्या

Single Movie : अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब यांच्या ‘सिंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला रिलीज होणार

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड, वाचा सविस्तर…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.