आजोबा-पणजोबा पोतराज, वडील चरित्र गायक, नोकरीचा कॉल फाडला; वाचा, विष्णू शिंदेंची कहाणी

आंबेडकरी चळवळ ही नेहमीच प्रबोधनाची चळवळ राहिली आहे. या चळवळीला राजकारणी, विचारवंत, साहित्यिक, कवींनी जेवढं योगदान दिलं तेवढंच योगदान कलावंतांचं राहिलं आहे. (vishnu shinde)

आजोबा-पणजोबा पोतराज, वडील चरित्र गायक, नोकरीचा कॉल फाडला; वाचा, विष्णू शिंदेंची कहाणी
vishnu shinde
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 7:20 AM

मुंबई: आंबेडकरी चळवळ ही नेहमीच प्रबोधनाची चळवळ राहिली आहे. या चळवळीला राजकारणी, विचारवंत, साहित्यिक, कवींनी जेवढं योगदान दिलं तेवढंच योगदान कलावंतांचं राहिलं आहे. किंबहुना कलावंतांनी ही चळवळ अधिक वाढवली आहे. ऊन-वारा पाऊस झेलत कोणत्या मानसन्मान आणि बिदागीची अपेक्षा न करता या कलावंतांनी आंबेडकरी विचार खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यात नेला. प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे हे त्यापैकीच एक. विष्णू शिंदे यांनीही गाणं हेच ध्येय मानून समाजप्रबोधन केलं. शिंदे यांची गायक म्हणून जडणघडण कशी झाली? त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी काय? यावर टाकेलला हा प्रकाश. (why vishnu shinde not accepted government jobs, know details)

खानदानी वारसा

प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांचं विष्णू तुळशीराम शिंदे हे संपूर्ण नाव. 17 डिसेंरब 1961 रोजी आजोळी लातूरच्या औसा तालुक्यातील काळमार्थ येथे त्यांचा जन्म झाला. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे त्यांचं गाव. शिंदे यांना लहानपणापासून गाण्याची आवड होती. घरातच गाण्याचा वारसा होता. शिंदेंच्या घराण्यात सहाव्या पिढीपासूनचं गाणं गायलं जात आहे. त्यांचे आजोबा तानाजी शिंदे आणि पणजोबा पांडूरंग शिंदे हे पोतराज होते. त्यामुळे त्यांना देवीची गाणी गाण्यासाठी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी बोलावणं होई. त्यामुळे गाणी गाऊन पोट भरणं हा या कुटुंबाचा रोजगाराचा भाग बनला होता. विष्णू शिंदे यांचे वडील तुळशीराम शिंदे हे चरित्र गायक होते. श्रावण बाळांच्या कथांपासून ते इतर धार्मिक कथा ते गाण्याच्या माध्यमातून सांगायचे. कथाकार म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांची आई गंगाबाई या सुद्धा चांगल्या गायिका होत्या. आजोबा-पणजोबा आणि आईवडिलांच्या गाण्याचा हाच वारसा विष्णू शिंदेंकडे आला. त्यांनी इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यामुळे त्यांनी नोकरी करावी असा घरच्यांचा आग्रह होता. मात्र, घरच्यांचा आग्रह मोडून त्यांनी गाणं हेच जीवन ध्येय मानलं आणि त्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं. एवढेच नव्हे तर गाण्याचा हा वारसा त्यांनी पुढच्या पिढीलाही दिला आहे. त्यांची पाचही मुले ( 3 मुली, 2 मुले) घराण्याचा हा वारसा पुढे चालवत आहेत.

अन् नोकरीचा कॉल फाडला

घरातून गाण्याचा वारसा मिळाला असला तरी गाणं हे प्रबोधनाचं साधन आहे, याची प्रेरणा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाली. त्यामुळेच गाण्याच्या वेडापायी कंडक्टरच्या नोकरीचा आलेला कॉल त्यांनी फाडला. ‘माझी दहा भाषणे आणि माझ्या शाहिराचं एक गाणं’ हे बाबासाहेबांचे कौतुकाचे बोल त्यांनी काळजात कोरुन ठेवले होते. बाबासाहेबाच्या या वाक्याने तर त्यांना झपाटून टाकलं होतं. म्हणूनच ते वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन समाजप्रबोधन करत होते.

दोन कॅसेट, पहिला सामना

वयाच्या बाराव्या वर्षी शिंदे यांनी स्टेजवर पहिलं गाणं गायलं. 1971मध्ये त्यांनी मुंबई गाठली. ऐंशीच्या दशकात त्यांची ‘हुंडा मागणारा नवरा नको’ ही कॅसेट बाजारात आली. या कॅसेटला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी सुरुवातीच्या काळात लोकगीतं खूप गायली. कारण त्याकाळी गायकांवर लोकगीतांचा प्रभाव खूप होता. परंतु, 56 च्या धर्मांतरानंतर मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि राजकीय बदल झाले. तसेच सांस्कृतिक बदलही झाले. त्यामुळे दलित समाजातील गायकांनी आपल्या गाण्याचा ट्रॅक बदलून थेट बुद्ध-भीम गीते लिहिण्यास आणि गाण्याससुरुवात केली. शिंदे यांनीही या नंतर आपला ट्रॅक बदलला. त्यांनीही भीमगीतांवर भर दिला. 1980-85मध्ये शिंदे यांची पहिली भीम गीतांची कॅसेट बाजारात आली. ‘महुच्या मातीत’ ही ती कॅसेट. या कॅसेटने त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्या काळात हिंदीप्रमाणेच मराठी कव्वाली गीतांचे सामने व्हायचे. त्यांचा पहिला सामना 1974मध्ये चेंबूरच्या लालडोंगर परिसरात झाला. त्यांच्या प्रतिस्पर्धी गायिका होत्या चंद्रकला गायकवाड. आपल्या गायन कलेबाबत ते म्हणतात, गाणं हा आमचा खानदानी वारसा आहे. तो जोपासायचा मी मनापासून ठरवलं. त्यानंतर बारावीनंतर या क्षेत्राला वाहून घ्यायचं ठरवलं. (साभार: आंबेडकरी कलावंत) (why vishnu shinde not accepted government jobs, know details)

संबंधित बातम्या:

पँथर ते बसपा… कार्यकर्ताही आणि कवी, गीतकारही…; असे होते हृदयनाथ सिन्नरकर

साहिरचा बंडखोरपणा आणि माडगुळकरांच्या शैलीचा मिलाफ; सिन्नरकर कसे घडले वाचा!

‘जग बदल घालूनी घाव…’ हे लोकप्रिय गाणं अण्णा भाऊ साठेंना कुठे सूचलं?; हृदयनाथ सिन्नरकरांनी सांगितलेला किस्सा वाचा!

(why vishnu shinde not accepted government jobs, know details)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.