Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: टमटमच्या मागे लिहिलेल्या वाक्यावरून सुचली लावणी; ‘इर्सल’मध्ये माधुरी पवारची नखरेल अदाकारी

दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटकं आली आहेत. बर्‍याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. ‘इर्सल’ हा सिनेमा एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो.

Video: टमटमच्या मागे लिहिलेल्या वाक्यावरून सुचली लावणी; 'इर्सल'मध्ये माधुरी पवारची नखरेल अदाकारी
Madhuri PawarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:30 AM

आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) ‘या बया दाजी आलं’ म्हणत प्रेक्षकांना घायाळ करायला सज्ज झाली आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत आगामी बहुचर्चित ‘इर्सल’ (Irsal) या मराठी चित्रपटात (Marathi Movie) माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी बघायला मिळणार आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे. ‘इर्सल’ चित्रपटाला ‘नाद करायचा नाय’ फेम संगीतकार दिनकर शिर्के यांचे संगीत लाभले असून ‘या बया दाजी आलं’ हे बहारदार गीत त्यांनीच लिहिले आहे.

‘या बया दाजी आलं’ या गाण्याबद्दल बोलताना गीत, संगीतकार दिनकर शिर्के म्हणाले, ‘या बया दाजी आलं’ ही लावणी मला एका प्रवासादरम्यान सुचली, एका टमटमच्या मागे हे वाक्य लिहिलेलं होतं. छोट्या मुलीने ते वाचलं आणि ती ते सारखं गुणगुणत होती. त्यातून ही लावणी घडली. उर्मिला धनगर यांनी आपल्या खास शैलीत स्वरबद्ध केली असून, नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आणि एक्सप्रेशन क्वीन माधुरी पवारने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. चित्रपटात आणखी चार गाणी असून, प्रत्येकाचा बाज वेगळ्या धाटणीचा असल्याने ‘इर्सल’ ची गाणी प्रेक्षकांना भावतील, असा विश्वास आहे.

पहा व्हिडीओ-

हे सुद्धा वाचा

दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटकं आली आहेत. बर्‍याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. ‘इर्सल’ हा सिनेमा एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो. प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार जाणूनबुजून किंवा अप्रत्यक्ष या षडयंत्रात कसा गोवला जातो? ते इर्सलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हेच या सिनेमाचं वेगळेपण आहे. ‘इर्सल’चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत, तर विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, शरद जाधव, संजय मोहिते, सुधीर फडतरे यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘इर्सल’ चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. ‘इर्सल’चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित ‘इर्सल’ येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.