अखेर बहुचर्चित चित्रपट ‘नवरदेव B Sc. Agri’चे पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ

नवरदेव B Sc. Agri चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नवरदेव B Sc. Agri हा चित्रपट सध्याच्या ज्वलंत विषयावर आहे. या चित्रपटात अभिनेता क्षितीश दाते हा मुख्य भूमिकेत असून चित्रपट धमाका करेल असेही सांगितले जातंय.

अखेर बहुचर्चित चित्रपट 'नवरदेव B Sc. Agri'चे पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 7:51 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. विशेष: ग्रामीण आणि शेतकरी असलेल्या मुलांचे लग्न होणे फार जास्त कठीण होऊन बसले. 35 वय झाले तरीही अनेक मुले हे ग्रामीण भागात बिनालग्नाचे आहेत. कोणत्याच मुलीला शेतकरी नवरा आणि खेड्या गावात राहण्याची इच्छा नाहीये. याचा परिणाम असा झालाय की, ग्रामीण भागातील मुलांचे लग्नच होत नाहीयेत. प्रत्येक मुलीला पुणे आणि मुंबईचाच मुलगा हवाय. हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून अत्यंत मोठा होत जातोय. आता याच ज्वलंत प्रश्नावर चक्क एक अस्सल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीया येतोय.

या चित्रपटाचे नाव ‘नवरदेव B Sc. Agri.’ आहे. विशेष म्हणजे या धमाकेदार चित्रपटाचे नुकताच एक पोस्टर रिलीज झालंय. अत्यंत खास पद्धतीने चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्वांचा आवडता अभिनेता अर्थात क्षितीश दाते हा नवरदेवाचा भूमिकेत धमाल करताना दिसणार आहे. पुण्यात पोस्टर लाॅन्चचा सोहळा हा पार पडलाय.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमोडे आहेत. हा चित्रपट चांगलाच धमाका करेल हे सांगितले जातंय. हा चित्रपट 26 जानेवारी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. हा बहुचर्चित चित्रपट नक्कीच ठरताना दिसतोय. आता पोस्टनंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटात तगडी कलाकारांनी टीम असून क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक धमाका करताना दिसतील. आज रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्षितीश दाते हा मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार असल्याचे दिसतंय. हा नक्कीच अनेकांच्या आवडतीच्या विषयावर आहे.

हा चित्रपट आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित आहे. नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत. चाहत्यांना हे रिलीज झालेले पोस्टर प्रचंड आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. या चित्रपटाकडून निर्मात्यांसह कलाकारांना नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.