‘बडा कमजोर लेग पिस है’ म्हणत बॉडीशेम करणाऱ्यांना केतकी माटेगावकरकडून सडेतोड उत्तर

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरने बॉडीशेमिंगविरोधात आवाज उठवला आहे. केतकीला अनेकदा बॉडीशेमिंगला सामोरं जावं लागलं. तिच्या दिसण्यावरून, शरीरावरून तिला हिणवलं गेलं. अशा ट्रोलर्सना तिने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचसोबत चाहत्यांसाठीही खास संदेेश लिहिला आहे.

'बडा कमजोर लेग पिस है' म्हणत बॉडीशेम करणाऱ्यांना केतकी माटेगावकरकडून सडेतोड उत्तर
केतकी माटेगावकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 10:10 AM

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सतत बॉडीशेम करणाऱ्यांसाठी केतकीने ही पोस्ट लिहिली आहे. केतकीला तिच्या दिसण्यावरून जे नेटकरी हिणवतात, त्यांचे मेसेजही तिने या पोस्टच्या अखेरीस शेअर केले आहेत. कुपोषित, बडा कमजोर लेग पीस है.. असे मेसेज आणि कमेंट्स त्यात पहायला मिळत आहेत. अशा ट्रोलर्सना केतकीने सणसणीत उत्तर दिलं आहे. फक्त तिलाच नाही तर ज्यांना कोणाला बॉडीशेम केलं जातं, अशा सर्वांसाठी तिने खास संदेश लिहिला आहे.

केतकी माटेगावकरची पोस्ट-

“किती बारिक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारिक होतास, आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिसमधले सहकर्मचारी असो, कोणीही असो. आपल्याला नेहमी या अशा वाक्यांना सामोरं जावं लागतं”

हे सुद्धा वाचा

“मी एवढं म्हणेन, या सगळ्यात मी तुमच्यासोबत आहे. अशा गोष्टींशी माझाही संबंध आला आहे. पण तुमच्या शरीराबद्दल तुम्ही अभिमान बाळगा. तुम्ही सुंदर आणि अनोखं आहात. तुमच्यातील अनोखेपणाची किंमत करा. कारण ती देवाची देण आहे. जर एखादा डॉक्टर, आहारतज्ज्ञ किंवा कोणीही पात्र असलेली व्यक्ती किंवा तुमच्याबद्दल ज्यांना खरीच काळजी असणारे मित्र, पालक यांचंच ऐका. पण एखादी व्यक्ती जर तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी काही म्हणत असेल किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल वाईट वाटेल असं काही म्हणत असेल तर त्यांचं अजिबात ऐकू नका”, असं तिने चाहत्यांना सांगितलं आहे.

या पोस्टमध्ये तिने ट्रोलर्सना उद्देशून पुढे लिहिलंय, “प्रिय ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत स्किनी (बारिक), हाडांचा सापळा, बारिक आहे. हो आहे आणि तरीसुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारिक.. तशी मी सुद्धा आहे बारिक. तरीही अजिबात न थकता 17-18 तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असले. पण म्हणून मी निरोगी नाही का? तर अजिबात नाही. व्यायाम किंवा जिम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीक आहे. पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्ट्सवर खुलेपणाने कमेंट करणं याला तुम्ही स्वातंत्र्य आणि फ्री स्पीच असं नाव देता.”

“आम्हाला या ट्रोलिंगची आता सवय झाली आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या, प्रोत्साहित करणाऱ्या त्या 100 आणि 1000 सुंदर लोकांच्या तुलनेत तुम्ही फार कमी आहात. आम्ही कलाकारसुद्धा माणसं आहोत. ठेच लागली तर आम्हालाही रक्त येतं, आम्हालाही वेदना होतात. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील, आई असेल. याचा विचार करा. काही लोकं असेही असतील ज्यांना खरंच मेडिकल समस्या असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल. अशा लोकांना तुम्ही किती भयंकर मानसिक स्थितीत ढकलत आहात, याचा जरा विचार करा. थोडं प्रेमळ आणि दयाळूपणे वागा. थोडी सहानुभूती आणि करुणा दाखवा”, असंही ती पुढे म्हणाली.

“माझ्या सर्व प्रेमळ आणि सर्वांत मौल्यवान चाहत्यांनी मी सांगू इच्छिते, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि प्रामाणिकतेसाठी मी तुमचे आभार मानते. मी जशी आहे, तसा तुम्ही माझा स्वीकार केलात. तुम्ही मला समजून घेतलात. तुमच्या सकारात्मकतेच्या संदेशाने मला प्रोत्साहन दिलं आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, असं काही घडतं तेव्हा सर्वांत आधी तुम्ही तुमच्या पोस्टने आणि मेसेजने माझ्या चेहऱ्यावर हसू आणता. मी तुमचे मेसेज, कमेंट्स वाचत असते आणि तुमच्याकडून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल मी खूप ऋणी आहे. मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन”, अशा शब्दांत केतकीने भावना व्यक्त केल्या आहेत.

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.