Vaalvi | ‘वाळवी’च्या प्रचंड यशानंतर चित्रपटाच्या टीमकडून मोठी घोषणा; आता ‘वाळवी 2’ येणार भेटीला

13 जानेवारीला वाळवी हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहरुख खानचा 'पठाण'सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही 'वाळवी'ने तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातही आपलं स्थान कायम ठेवलं.

Vaalvi | 'वाळवी'च्या प्रचंड यशानंतर चित्रपटाच्या टीमकडून मोठी घोषणा; आता 'वाळवी 2' येणार भेटीला
Vaalvi | 'वाळवी'च्या प्रचंड यशानंतर चित्रपटाच्या टीमकडून मोठी घोषणाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 3:57 PM

मुंबई: परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या मराठीतल्या पहिल्या थ्रिलकॉम चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला. हेच यश साजरं करण्यासाठी चित्रपटाच्या टीमकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्टीत आता ‘वाळवी 2’ची घोषणा करण्यात आली आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी ‘वाळवी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचं जाहीर केलं.

याविषयी निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. त्यांच्याकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच आम्हाला वाळवी 2 ची प्रेरणा मिळाली. वाळवीमध्ये ज्याप्रकारे अनेक गोष्टी अनपेक्षित होत्या, त्यापेक्षाही जास्त सस्पेन्स आणि थ्रील वाळवी 2 मध्ये असेल. सध्या तरी हे सगळं गुपित आहे.”

झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी या सीक्वेलबद्दल म्हणाले, “या यशात दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील संपूर्ण टीम यांच्यासोबतच मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. मीडियाने वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत वाळवीला पोहोचवलं. लवकरच आता वाळवी 2 हा थ्रीलकॉम घेऊन तुमच्या भेटीला येऊ.” वाळवी 2 मध्ये कोणते कलाकार असतील हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

‘वाळवी’ची दमदार कामगिरी

13 जानेवारीला वाळवी हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहरुख खानचा ‘पठाण’सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही ‘वाळवी’ने तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातही आपलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या आठवड्यात काही थिएटरमध्ये वाळवीचे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले होते.

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. वाळवी या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या भूमिका आहेत.

‘वाळवी’ची कथा

वाळवी हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती लाकडू पोखरणारी किड. हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेल्या वाळवीची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळाली. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की आखलेला डाव फिरणार, सुबोधकडे असं नक्की काय गुपित आहे, या सगळ्याशी वाळवीचा काय संबंध, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळाली.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.