‘मरके भी माही तुझसे मुँह न मोडना’, जेव्हा अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसाठी स्टेटस ठेवत संपवलं आयुष्य
LOVE LIFE | सुरुवातीला त्याने अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम केलं, पण ते फार काळ नाही टिकलं, तिने स्वतःला तर संपवलं, पण शेवटी म्हणाली 'मरके भी मुंह ना तुझसे मुँह मोडना...', आजही अभिनेत्रीला नाही विसरु शकले चाहते... चाहत्यांचं तिने मनोरंजन केलं, पण तिच्यासोबत...
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटतं. झगमगत्या विश्वात असे अनेक कपल आहेत, जे आपल्या आवडत्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येवू नये म्हणून सतत प्रयत्न करत असतात. पण एक दिवस असा येतो, जेव्हा त्याच व्यक्तीकडून आपल्याला प्रचंड त्रास होतो, मनात अनेक गोष्टी सुरु असतात… आताच्या काळात सोशल मीडियावरील स्टेटसवरुन समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय सुरु आहे, याचा अंदाज बांधला जातो.. दरम्यान, झगमगत्या विश्वातील एका अभिनेत्रीने देखील आयुष्यातील खास व्यक्तीसाठी व्हॅट्स ऍपवर स्टेटस ठेवलं आणि स्वतःचं आयुष्य संपवलं..
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री असल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं होतं. बॉयफ्रेंडसाठी स्टेटस ठेवत ज्या अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी होती. आज अभिनेत्रीच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील तिच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.
करियरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आणि सर्वकाही संपवलं. प्रत्युषा हिच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा, अभिनेत्री बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पण राहुल आणि प्रत्युषा यांच्यातील वाद दिवसागणिक वाढतच होते.
राहुल सतत आपल्यासोबत भांडतोय म्हणजे, त्याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असेल… अशी शंका अभिनेत्रीच्या मनात निर्माण झाली होती. अखेर १ एप्रिल २०१६ मध्ये अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आणि सर्वकाही तिथेच कायमसाठी थांबलं… पण मृत्यूपूर्वी अभिनेत्री स्टेटसने सर्वाना मोठा धक्का बसला…
मृत्यूपूर्वी प्रत्युषा हिने व्हाट्ऍप स्टेटसवर ‘मरके भी माही तुझसे मुँह न मोड ना, बोल ना माही बोलना…’ ही अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या गाण्यातील एक ओळ लिहिली होती. एवढंच नाही तर डिप्रेशनमध्ये असल्यामुळे अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.
प्रत्युषा आज जिंवत नसली तरी, अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांच्या मनात अभिनेत्रीने घर केलं होतं. आजही चाहते तिला विसरू शकले नाहीत. ‘बालिका वधू’ मालिकेत आनंदी ही भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली होती. पण जेव्हा तिच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा चाहत्यांसह संपूर्ण झगमगत्या विश्वाला मोठा धक्का बसला..