अफेअरच्या बातम्यांविरोधात भडकली मयुरी देशमुख; म्हणाली ‘कोणाबद्दल काहीही बोलण्याआधी..’

अभिनेत्री मयुरी देशमुखने काही दिवसांपूर्वी तिच्या एका खास मित्रासोबत फोटो पोस्ट केला होता. त्यावरून दोघांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरून काही बातम्याही झळकल्या होत्या. याविरोधात अखेर मयुरीने मौन सोडलं आहे.

अफेअरच्या बातम्यांविरोधात भडकली मयुरी देशमुख; म्हणाली 'कोणाबद्दल काहीही बोलण्याआधी..'
मयुरी देशमुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 10:12 AM

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या खासगी आयुष्यासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मयुरीने तिच्या एका जवळच्या मित्रासोबतचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर संबंधित व्यक्तीसोबत मयुरीच्या अफेअरच्या बातम्या झळकू लागल्या होत्या. त्यावरच आक्षेप घेत तिने ही भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. मयुरीच्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मयुरी देशमुखची पोस्ट-

‘जेव्हा तुमच्याबद्दल बिनबुडाची बातमी येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणंच शहाणपणाचं ठरतं. अशाने ती बातमीच मरते. त्यामुळे जेव्हा नुकतंच माझ्या एका चांगल्या मित्राशी माझं नातं जोडणारी एक हास्यास्पद बातमी व्हायरली झाली, तेव्हा माझे मित्र, कुटुंबीय आणि त्याची पत्नीसुद्धा हसून मला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.’

हे सुद्धा वाचा

‘माझ्याकडे कुटुंब आणि मित्रांची खूप मजबूत साथ असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणं आणि पुढे जाणं सोपं होतं. पण मला प्रश्न पडतो की एकटे किंवा कमकुवत मनाचे लोक अशा परिस्थितीत काय करत असतील? अशा निराधार अफवा सहन करण्यासाठी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर नसलेले व्यक्ती काय करत असतील? कोणाबद्दलही काही बोलण्याआधी किंवा प्रकाशित करण्याआधी आपण चांगलं संशोधन का करत नाही?’

‘आपण अधिक दयाळू का होऊ शकत नाही? दुबळे किंवा कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी हे जग आनंददायी का करू शकत नाही? अशा त्रासदायक घटनांमधून बाहेर पडण्याची लढाई अत्यंत कठीण असते. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती ती लढाई लढत असते तेव्हा त्या व्यक्तीला आधार द्या किंवा राहू द्या. आपण सर्वजण प्रत्येकाबाबत थोडं अधिक सजग, दयाळू आणि प्रेमळ होऊ अशी आशा करते,’ अशी पोस्ट मयुरीने लिहिली आहे.

कोणतीही गोष्ट माहित नसताना जेव्हा लोक काहीही बोलतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असतं, असं अभिनेता सुयश टिळकने लिहिलंय. तर ‘मी तुझ्याशी सहमत आहे. हेडलाइन्स, बातम्या, विचार न करता केलेल्या कमेंट्स या विश्वात दुर्दैवाने संशोधन आणि अभ्यास हरवला आहे,’ असं मयुरीची खास मैत्रीण आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेनं म्हटलंय.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून मयुरी घराघरात पोहोचली. मयुरीचा पती आशुतोष भाकरे याने 2020 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं होतं. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. पतीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरत काही महिन्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली होती.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.