Meena Kumari यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी असं काय केलं? ज्यामुळे अभिनेत्रीचा झाला घटस्फोट

मीना कुमारी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पतीने नेमला होता व्यक्ती; त्याने असं काय पाहिलं ज्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात आल्या अडचणी... धर्मेंद्र यांच्यामुळे नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं...

Meena Kumari यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी असं काय केलं? ज्यामुळे अभिनेत्रीचा झाला घटस्फोट
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 2:53 PM

Meena Kumari Dharmendra Love Story : अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. विवाहित असताना धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी (dharmendra wife) यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र यांच्यासोबत अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांचं नाव देखील जोडण्यात आलं. मीना कुमारी यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून देखील ओळखलं जात आसे. मीना कुमारी फक्त सिनेमांमुळेच नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत होत्या. मीना कुमारी यांचं लग्न फिल्ममेकर कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर मीना कुमारी यांना आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. लग्नानंतर मीना कुमारी यांच्यापुढे अनेक बंधनं होती.

फिल्ममेकर आणि पती कमाल अमरोही यांनी काही अटींसह मीना कुमारी यांना सिनेमांमध्ये काम करण्याची परवानगी दिली होती. मीना कुमारी यांनी संध्याकाळी घरी यायला हवं तर त्यांच्या मेकअप रुममध्ये कोणत्याही पुरुषाला एन्ट्री नव्हती. अशा अटी मीना कुमारी यांच्यावर पतीने लादल्या होत्या. मीना कुमारी त्या काळी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण त्यांची चर्चा कायम खासगी आयुष्यामुळे रंगली.

मीडिया रिपोर्टनुसार, कमाल अमरोही यांनी पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी एका व्यक्तीला नेमलं होतं. जो मीना कुमारी यांना कोण भेटतं, त्या कुठे जातात? याबद्दल सर्व माहिती कमाल अमरोही यांना देत असे. एकदा गुलजार मीना कुमारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रुममध्ये गेले होते. तेव्हा ही गोष्ट पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीने कमाल अमरोही यांना सांगितली. (affairs relationships)

हे सुद्धा वाचा

तेव्हा कमाल अमरोही यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मीना कुमारी यांच्या कानशीलात लगावली. यामुळे कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्यामध्ये वाद झाले. आयुष्यात अनेक चढ-उतार होत असताना मीना यांचं नाव अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत जोडण्यात आलं. यामुळे कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांचा घटस्फोट देखील झाला. (bollywood love)

कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांचा घटस्फोट

एक काळ असा होता जेव्हा मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. धर्मेंद्र यांना यशाच्या दिशेने घेवून जाणाऱ्या मीनाच होत्या असं सांगितलं जातं. याचदरम्यान मीना आणि धर्मेंद्र यांचा एक फोटो समोर आला. ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी लुंगी लावली होती. तर मीना कुमारी यांच्या हातात उशी होती. धर्मेंद्र यांच्यासोबत मीना यांचा असा फोटो पाहिल्यानंतर कमाल अमरोही प्रचंड संतापले आणि त्यांनी मीना यांना घटस्फोट दिला. पण त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.