सनी देओलसोबत किसिंग सीन केला पण.. मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला ‘तो’ खास किस्सा

मिनाक्षीने राजकुमार संतोषी यांच्यासोबत फिस्कटलेल्या लग्नाचीही सांगितली गोष्ट..

सनी देओलसोबत किसिंग सीन केला पण.. मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला 'तो' खास किस्सा
मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला 'तो' खास किस्सा Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 1:33 PM

मुंबई: ‘दामिनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाका करणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आठवतेय का? 90 च्या दशकातील लोकप्रिय आणि टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होता. अमिताभ बच्चन ते विनोद खन्ना यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलं. मात्र करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मीनाक्षीने लग्न केलं आणि फिल्म इंडस्ट्री सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. मीनाक्षीने 1995 मध्ये लग्नानंतर बॉलिवूडला रामराम केला. आता पुन्हा ती भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा बोलून दाखवली.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी तिच्या चित्रपटांविषयी आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मीनाक्षी सध्या पुण्यात राहतेय, तर तिचे पती आणि मुलं अमेरिकेत राहत आहेत.

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत तिने अभिनेता सनी देओलसोबतच्या किसिंग सीनचा उल्लेख केला. “डकैत या चित्रपटात माझा आणि सनीचा किसिंग सीन होता. त्यावेळी सनीने अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तो सीन हाताळला. याचं संपूर्ण श्रेय मी त्याला देईन. त्याच्यामुळेच मी कम्फर्टेबल होते. मात्र नंतर सेन्सॉरने तो सीन चित्रपटातून काढून टाकला”, असं मीनाक्षीने सांगितलं.

मीनाक्षी तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली होती. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना मीनाक्षीसोबत लग्न करायचं होतं. या फिस्कटलेल्या लग्नाची गोष्टसुद्धा तिने सांगितली. एके दिवशी राजकुमार संतोषी हे अचानक काही लोकांना विमानातून कोलकाताला घेऊन गेले आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते मीनाक्षीसोबत लग्न करणार होते, अशी चर्चा त्यावेळी झाली होती.

लग्नाच्या चर्चांवर मीनाक्षी म्हणाली, “ज्यावेळी ती चर्चा झाली तेव्हा यश चोप्रा आणि अमजद खान यांनी पुढाकार घेत आधी ‘दामिनी’ हा चित्रपट पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतोषी आणि मीसुद्धा निर्णय घेतला की घडलेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडत दामिनी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनवण्यावर लक्ष केंद्रीत करायचं. ज्या काही खासगी चर्चा झाल्या असतील, असं झालं, तसं झालं.. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आणि हीच सर्वांत चांगली गोष्ट होती. असंच करणं योग्य होतं. पुढे मी लग्न केलं आणि माझं आयुष्य जगू लागले. त्यांनीसुद्धा लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले.”

दामिनी या चित्रपटानंतरही मीनाक्षी आणि राजकुमार संतोषी यांनी ‘घातक’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. खासगी आयुष्यात काहीही घडलं तरी कामावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही हे दोघांनी ठरवलं होतं, असं मीनाक्षीने स्पष्ट केलं.

मीनाक्षीने इन्वेस्टमेंट बँकर हरिष मैसूर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना 24 वर्षांची केंड्रा ही मुलगी आणि 20 वर्षांचा जॉश हा मुलगा आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.