‘शोले’ सिनेमातीत भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आला होता फ्रिज
'शोले' सिनेमातील या अभिनेत्याला अगदी कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहे. आता अभिनेता कोण आहे चला जाणून घेऊया...

बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमांच्या यादीमधील एक सिनेमा म्हणजे ‘शोले.’ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या या सिनेमाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला होता. या चित्रपटाची आजही चर्चा होताना दिसते. अनेकजण आवडीने कुटुंबीयांसोबत आजही हा सिनेमा पाहण्याचा आनंद घेतात. तुम्हाला माहिती आहे का जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. पण नंतर या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातील एका अभिनेत्याला मानधनामध्ये पैसे देण्याऐवजी थेट फ्रीज देण्यात आला होता.
‘शोले’ हा चित्रपट एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात त्याकाळातील बड्या स्टार्सने काम केले होते. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, जया बच्चन, संजीव कुमार हे कलाकार दिसले होते.
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी १ लाख ५० हजार रुपये मानधन घेतले होते. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटात एक असा अभिनेता होता ज्याला मानधन म्हणून फ्रीज देण्यात आला होता. या अभिनेत्याने जवळपास ६५ सिनेमांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले आहे. तसेच ५० पेक्षा जास्त सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. बॉलिवूडसोबतच या कलाकाराने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. या अभिनेत्याचे नाव सचिन पिळळगावकर असे आहे.




सचिन पिळगावकर यांनी ‘शोले’ सिनेमामध्ये एक तरुण मुलगा अहमदची भूमिका साकरली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी खुलासा केला होता की, चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना नवाकोरा फ्रीज देण्यात आला होता. ही १९७० सालामधील गोष्ट आहे. त्या काळात घरात फ्रीज असणे ही खूप मोठी गोष्ट होती. आजकाल फ्रीज हे सर्वांच्या घरात असतात.