कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं

बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब कोणतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? हे कपूर, खान किंवा चोप्रा कुटुंब नाही. एकेकाळी या कुटुंबातील सदस्य दिल्लीत फळं विकायचे. मात्र एका कॅसेटची कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांचं नशीब पालटलं.

कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील 'हे' कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
गुलशन कुमार यांचं कुटुंबImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 9:37 AM

चित्रपटसृष्टी हा कौटुंबिक व्यवसाय झाला आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठे स्टुडिओ आणि प्रॉडक्शन हाऊस हे विविध कुटुंबाच्या मालकीचे आहेत. आता याच मोठ्या प्रॉडक्शन हाऊस मोठ्या कंपन्या बनल्या आहेत. यामुळे बॉलिवूडमधील काही कुटुंबांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये सर्वांत श्रीमंत कुटुंबाकडे तब्बल 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.

बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब

‘हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024’ने या देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थातच अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे अग्रस्थानी आहेत. त्यात फिल्म इंडस्ट्रीतील काही नावांचाही समावेश आहे. बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब म्हटल्यावर कदाचित तुम्ही कपूर, खान, चोप्रा किंवा जोहर अशी नावं घ्याल. मात्र यापैकी कोणी नसून टी-सीरिजच्या भूषण कुमार यांचं कुटुंब सर्वांत श्रीमंत ठरलंय. भूषण कुमार यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची संपत्ती मिळून तब्बल 10 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचं ‘हुरुन’ने म्हटलंय.

भूषण कुमार यांचं कुटुंब इतकं श्रीमंत

यशराज फिल्म्स आणि बीआर फिल्म्स यांची मालकी असलेलं चोप्रा कुटुंब एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब होतं. आदित्य चोप्राची संपत्ती मिळून एकूण कुटुंबाची संपत्ती 8000 कोटींच्या घरात आहे. मात्र टी-सीरिजच्या कुटुंबाने त्यांनाही मागे टाकलंय. त्याचप्रमाणे बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या कुटुंबाचीही एकूण संपत्ती 7500 कोटींच्या घरात आहे. तर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण संपत्ती 3500 कोटींच्या घरात आहे. सलमानच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित अक्किनेनी (नागार्जुन, नाग चैतन्य) आणि अल्लू-कोनिडेला (चिरंजीवी, अल्लू अर्जुन) कुटुंबाची संपत्ती अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

भूषण कुमार यांच्या कुटुंबाची संपत्ती

हुरुन रिच लिस्टने कुमार कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या संपत्तीचा आकडा दिला नाही. मात्र एकूण संपत्तीपैकी चार पंचमांश भाग हा भूषण कुमारचाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याच्या बहिणी तुलसी कुमार आणि खुशाली कुमार यांची संपत्ती 250 कोटी आणि 100 कोटी रुपये अनुक्रमे आहे. टी-सीरिजचे सहमालक आणि भूषण कुमारचे काका किशन कुमार यांचीही बऱ्यापैकी संपत्ती आहे.

भूषण कुमारचे वडील आणि किशन कुमार यांचे भाऊ गुलशन कुमार हे दिल्लीत फळं विकायचे. 70 च्या दशकात जेव्हा त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी म्युझिक कॅसेट्स विकणारं दुकान चालवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांचं नशीब पालटलं. त्यानंतर त्यांनी स्वत:ची म्युझिक कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव आधी सुपर कॅसेट्स असं होतं. नंतर ते नाव बदलून टी-सीरिज असं ठेवलं गेलं.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.