टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं अवघ्या 21 वर्षी निधन; सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोअर्स

21 वर्षीय सोशल मीडिया स्टार मेघा ठाकूरने घेतला जगाचा निरोप; TikTok वर 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स

टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं अवघ्या 21 वर्षी निधन; सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोअर्स
Megha ThakurImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 8:15 AM

कॅनडा: सोशल मीडियावर एखाद्या फोटो किंवा व्हिडीओमध्ये कोण कधी रातोरात सेलिब्रिटी बनेल, हे सांगता येत नाही. टिकटॉकमुळे घरबसल्या अनेकजण स्टार झाले आहेत. अत्यंत कमी वयात लाखो फॉलोअर्स मिळवून अनेक तरुण-तरुणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनत आहेत. अशाच एका इंडो-कॅनेडीयन टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं अचानक निधन झालं. अवघ्या 21 व्या वर्षी मेघाने अखेरचा श्वास घेतला. टिकटॉक या अॅपवर मेघाच्या व्हिडीओंना भरपूर लाइक्स मिळायचे.

मेघा तिच्या डान्सचे आणि मोटीव्हेशनल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायची. अत्यंत कमी वयात तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग तयार झाला होता. मेघाच्या वडिलांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तिच्या निधनाची माहिती दिली. तिच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

हे सुद्धा वाचा

‘आमच्या आयुष्याचा प्रकाश, आमची काळजी घेणारी सुंदर मुलगी मेघा ठाकूरचं 24 नोव्हेंबर 2022 रोजी अचानक निधन झालं’. अशी पोस्ट तिच्या वडिलांनी लिहिली. मेघाच्या निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Megha (@meghaminnd)

मेघा ही मूळची मध्यप्रदेशातील इंदूर इथली राहणारी आहे. 2001 मध्ये तिचा जन्म झाला. ती एक वर्षाची असताना तिचे आई-वडील कॅनडाला स्थायिक झाले. मेघाचं शिक्षण कॅनडामध्येच पूर्ण झालं.

View this post on Instagram

A post shared by Megha (@meghaminnd)

सोशल मीडियाने अत्यंत कमी वयात मेघाला स्टार बनवलं होतं. टिकटॉकवर मेघाचे 9 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 93 हजार आणि इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बॉडी पॉझिटिव्हीचे अनेक व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करायची. तिच्या डान्सचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.