Mika Singh | मित्रासाठी मिका सिंग याने मोजले कोट्यवधी रुपये, गायकाने असं केलं तरी काय?

मित्रासाठी काही पण... फक्त दिल्ली येथेच नाही तर, मुंबई याठिकाणी देखील मित्रासाठी मिका सिंग याने खर्च केले एक, दोन नाही तर इतके कोटी...गायकाने मित्रासाठी असं केलं तरी काय?

Mika Singh | मित्रासाठी मिका सिंग याने मोजले कोट्यवधी रुपये, गायकाने असं केलं तरी काय?
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 10:04 AM

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : आयुष्यात आपण ज्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करतो… ती व्यक्ती म्हणजे खास मित्र… प्रत्येकाच्या आयु्ष्यात असा एक तरी व्यक्ती असतो, जो आपल्यासाठी खास असतो. चांगल्या – वाईट प्रसंगात सर्वात आधी धावत येतो तो म्हणजे खास मित्र.. त्यामुळे खास मित्राच्या आयुष्यातील खास दिवस आनंददायी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक याने मित्राच्या वाढदिवसानिमित्त एक दोन नाही तर, चक्क ८ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे मित्र असावा तर मिका सिंग याच्यासारखा… अशा चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहेत. मिका सिंग याने मित्राला वाढदिवसानिमित्त तब्बल ८ कोटी रुपयांचं गिफ्ट दिलं आहे. तर गायकाने मित्राला असं कोणतं गिफ्ट दिलं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल…

मिका सिंग याने मित्राला दिलेल्या गिफ्टबद्दल माहिती झाल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. मिकाने खास मित्र कंवलजीत सिंग याचा नुकताच वाढदिवस साजरा केला. मिकाने मित्राला मुंबई आणि दिल्लीत कोटी रुपये किमतीचे दोन बंगले गिफ्ट केले आहेत. ही बातमी समोर येताच सर्वत्र मिका सिंग याचं कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

मिका सिंग याने त्याचा खास मित्र कंवलजीत सिंग याला मुंबई आणि दिल्लीत ४-४ कोटींचे दोन फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले आहे. ज्यामुळे सर्वत्र मिका सिंग याची चर्चा रंगत आहे. याआधी देखील मिकाने कंवलजीत सिंग याला एक मर्सिडीज कार गिफ्ट म्हणून दिली होती. कारची किंमत ८० लाख रुपये होती. आता पुन्हा मित्राला मुंबई आणि दिल्लीत घर गिफ्ट म्हणून दिल्यामुळे गायक चर्चेत आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मिका सिंग याच्याकडून जवळपास ९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. गायक जगभरातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायन करून प्रचंड पैसा कमावतो. त्याचबरोबर मिका टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधूनही भरपूर कमाई करतो. एका गाण्यासाठी गायक १५ लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो. गायकाचे अल्बमही सुपरहिट ठरतात. एवढंच नाही तर, मिका पार्टी, लग्न आणि स्टेज प्रोग्रामसाठी ३० ते ५० लाख रुपये मानधन घेतो.. सध्या सर्वत्र मिका सिंग याची चर्चा रंगत आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.