Mika Singh: मिका सिंगने प्रायव्हेट आयलँड खरेदी केला की नाल्यात खर्च केला पैसा?

'याला बेट म्हणावं की नाला?', आयलँड खरेदीवरून मिकाची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Mika Singh: मिका सिंगने प्रायव्हेट आयलँड खरेदी केला की नाल्यात खर्च केला पैसा?
Mika Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2022 | 12:55 PM

मुंबई- गायक मिका सिंगची (Mika Singh) बरीच गाणी बॉलिवूडमध्ये तुफान गाजली. सलमान खानपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांना मिकाने आपला आवाज दिला आहे. काही दिवसांपूर्वीच मिकाचा स्वयंवर पार पाडला. त्यानंतर तो आता वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मिकाने आता चक्क आयलँड (Island) विकत घेतला आहे. त्याचाच व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रायव्हेट आयलँडवर निवांत वेळ घालवताना दिसत आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये मिका सिंग बोट चालवताना पहायला मिळतोय. प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारा मिका सिंग हा पहिला भारतीय गायक आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलंय. आयलँडसोबतच मिकाने सात बोटी आणि 10 घोडेसुद्धा खरेदी केले आहेत.

सोशल मीडियावर मिकाचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ‘सिंग इज किंग’ म्हणत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी व्हिडीओत दिसणाऱ्या पाण्यावरून कमेंट्स केल्या आहेत. ‘आयलँडपेक्षा हा नालाच जास्त वाटतोय’ असं एकाने म्हटलंय. तर ‘वाह किती स्वच्छ पाणी आहे’, अशी खोचक कमेंट दुसऱ्याने लिहिली.

मिका काही दिवसांपूर्वी ‘मिका दी वोहटी’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गायक शानने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. या शोमध्ये भाग घेतलेल्या 12 स्पर्धकांमधून मिकाने त्याच्या जोडीदाराची निवड केली. आकांक्षा पुरी ही या शोची विजेती ठरली. मिका आणि आकांक्षा लवकरच लग्न करणार आहेत.

मिका सिंगचं खरं नाव अमरीक सिंग आहे. मिकाचे सहा भाऊ आहेत. त्यापैकी दलेर मेहंदी हा मोठा भाऊ आहे. मिकाने सुरुवातीला भावासोबत गिटारिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याचदरम्याने त्याने ‘रब रब कर दी’ हे गाणं संगीतबद्ध केलं. मिकाला ‘सावन मे लग गई आग’ या गाण्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली.