Love Life | ‘ती मला पापाजी म्हणते..’, वयाच्या ५२ व्या वर्षी २५ वर्ष लहान तरुणीसोबत अभिनेत्याने केलं लग्न

२५ वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केल्यामुळे ५२ वर्षीय अभिनेत्याला करावा लागला टीकेचा सामना... आता पत्नी अभिनेत्याला म्हणते 'पापाजी'.. सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Love Life | 'ती मला पापाजी  म्हणते..', वयाच्या ५२ व्या वर्षी २५ वर्ष लहान तरुणीसोबत अभिनेत्याने केलं लग्न
love life
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 12:23 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : प्रेमाला कोणतंही बंधन नसतं. प्रेम ही एक भावना असते… प्रेमासाठी अनेकांनी सर्व मर्यादा ओलांडत फक्त आणि फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं. झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी कपल्स आहेत, ज्यांच्या वयामध्ये फार अंतर आहे. ज्यामुळे अभिनेत्याने लहान तरुणीसोबत लग्न केल्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला, तर काही अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहन पुरुषासोबत लग्न केल्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. पण सेलिब्रिटींनी कधीच कोणत्याही टीकेल अधिक महत्त्व दिलं नाही. फक्त आपल्या जोडीदारावर प्रेम केलं. झगमगत्या विश्वात असा एक अभिनेता आहे, ज्याने वयाच्या ५२ व्या वर्षी ५२ वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केलं. अभिनेता कायम आपल्या पत्नीसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. शिवाय चाहत्यांना कपल्स गोल्स देखील देत असतो.

सध्या ज्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) आहे. मिलिंद कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. मिलिंद याचं नाव अनेक महिलांसोबत जोडण्यात आलं आहे.

२०१८ साली अंकिता कुंवर हिच्यासबोत लग्न केल्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला. दोघांच्या नात्यात जवळपास २५ वर्षांचं अंतर आहे. लग्नाच्या वेळी मिलिंद ५२ वर्षांचा होता. तर अंकिता फक्त २६ वर्षांची होती. अंकितासोबत लग्न करण्यापूर्वी मिलिंदचं पहिलं लग्न फ्रेंच अभिनेत्री मायलेन जंपनोईशी झाले होते.

हे सुद्धा वाचा

मिलिंद आणि मायलेन जंपनोई यांच्या वयात देखील मोठं अंतर होतं. मायलेन जंपनोई ही मिलिंद पेक्षा १५ वर्षांनी लहान होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. नात्यात सतत खटके उडू लागल्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर २००९ मध्ये मिलिंद आणि मायलेन जंपनोई यांचा घटस्फोट झाला.

पहिला घटस्फोट झाल्यानंतर देखील मिलिंद याचं नाव अनेक महिलांसोबत जोडण्यात आलं. पण जेव्हा अभिनेत्याने २५ वर्ष लहान मुलीसोबत लग्न केलं, तेव्हा सर्वांना अश्चर्याचा धक्का बसला. मिलिंद आणि अकिंता कायम एकमेकांसोबत फिटनेस आणि फिरण्याचे व्हिडीओ शेअर करायचे.

अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाआधी अंकिता नोकरी करत होती. पण लग्नाच्या काही दिवसांपूर्वी तिने नोकरीचा राजीनामा दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मुलाखतीत मिलिंद याने महत्त्वाचा खुलासा केला होता, अभिनेता म्हणाला होता की, ‘अंकिता कायम मला प्रेमाने पापाजी म्हणून हाक मारते…’ जेव्हा अंकिताने आईकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिच्या आईला मोठा धक्का बसला होता. पण आता अंकिता आणि मिलिंद एकमेकांसोबत आनंदी आहेत.

'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.