Mira Rajput : मीरा राजपूतनं शेअर केला शाहिद कपूरचा खास व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहिलं…

हा खास व्हिडीओ शेअर करताना मीरानं लिहिलेल्या कॅप्शनवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Mira Rajput shared Shahid Kapoor's special video, captioned)

Mira Rajput : मीरा राजपूतनं शेअर केला शाहिद कपूरचा खास व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहिलं…
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 12:33 PM

मुंबई : शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूतची (Mira Rajput) जोडी चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरते. 2015 मध्ये मीरा आणि शाहिदनं लग्नगाठ बांधली होती. हे सुंदर जोडपं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीत नुकतंच मीरा राजपूतनं तिच्या नवऱ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मीरा राजपूत सिनेमा जगतातली नसली तरी तिची फॅन फॉलोव्हिंग बड्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. मीरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अशा परिस्थितीत आता मीरानं चाहत्यांसाठी पती शाहिदचा व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओसोबतच तिनं एक खास कॅप्शन देखील लिहिलं आहे.

पाहा व्हिडीओ

मीराचे मजेदार कॅप्शन

मीरानं शाहिदचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिदच्या वेगळ्या लूकची झलक दिसून येतेय. व्हिडीओमध्ये त्याचे फोटो, कॅटवॉक, मुलाखती हे सगळं एकत्र दिसत आहे.

हा खास व्हिडीओ शेअर करताना मीरानं लिहिलेल्या कॅप्शनवर सर्वांचं लक्ष लागलं आहे, मीराने तिच्या पतीच्या या व्हिडीओवर आजचा गोड पदार्थ अर्थात (Dessert Tonight) असं लिहिलेलं आहे. मीराचं हे कॅप्शन चाहत्यांच्या समजण्यापलीकडे आहे. काही चाहते त्यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काहींना त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहिद कपूर कबीर सिंगनंतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. आता शाहिद लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. कबीर सिंगप्रमाणेच हा देखील साऊथ चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत पंकज कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिवाळीनिमित्त हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त ओटीटीमधून अभिनेत्याच्या पदार्पणाची चर्चाही समोर येत आहे.

शाहिद आणि मीराला मिशा आणि झेन अशी दोन मुले आहेत. मीरा तिच्या मुलांबरोबरच वेळ घालवायला आवडते. मीरा अनेकदा सोशल मीडियावर फिटनेस संबंधित व्हिडीओ शेअर करत असते, त्याचबरोबर मीरा तिच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. मीरा राजपूतचे इंस्टाग्रामवर 2.6  दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

संबंधित बातम्या

Sonali Bendre: वेळ लवकर निघून जाते… ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्त सोनाली बेंद्रेची काळजाला हात घालणारी पोस्ट

Photo: सोशल मीडियावर बॉलिवूडकरांच्या फोटोंचा नवा ट्रेंड; 90 च्या दशकातील झलक पाहा एकाच फ्रेममध्ये!

Photo : दिशा पटानीनं लावला हॉटनेसचा तडका, बोल्ड फोटो शेअर

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.