Mirzapur फेम अभिनेत्याच्या आयुष्यात होणार नव्या व्यक्तीची एन्ट्री; वर्षभरापूर्वी झालं लग्न
Mirzapur | सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त 'मिर्झापूर' फेम अभिनेता विक्रांत मेसी याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राकडून त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेता गेल्या वर्षी अडकला विवाहबंधनात...
मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | ‘मिर्झापूर’ (Mirzapur) वेब सीरिजला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. आता चाहते ‘मिर्झापूर’ सीरिजच्या तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘मिर्झापूर’ सीरिजच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु असताना सीरिजमधील एका अभिनेत्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा जोर धरत आहे. सीरिजमध्ये अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. अभिनेता विक्रांत मेसी याने गेल्या वर्षी गर्लफ्रेंड शीतल ठाकूर हिच्यासोबत लग्न केलं. पारंपरिक पद्धतीत दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला.. लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगत आहे. विक्रांत मेसी बाबा होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
अभिनेत्याच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची पत्नी गरोदर आहे. विक्रांत आणि शीतल त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचा आंनंद घेत आहेत. सध्या सर्वत्र विक्रांत आणि शीतल याच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नाही.
विक्रांत आणि शीतल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ दरम्यान दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि कालांतराने प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये फक्त कुटुंबियांच्या उपस्थितीत विक्रांत आणि शीतल यांचा रोका कार्यकम संपन्न झाला होता.
विक्रांत मेसीने त्याची पत्नी आणि लग्नानंतरच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी क्वचितच चर्चा केली आहे. एका मुलाखतीत शीतल हिचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले गेले आहे. विक्रांत आणि शीतल कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
विक्रांत मेसी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘मेड इन हेवन’, ‘गॅसलाइट’ आणि ‘मुंबईकर’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेता लवकरच ‘यार जिगरी’, ‘सेक्टर 36′, ’12वीं फेल’ आणि ‘फिर आई हसीं दिलरुबा’ या सिनेमांमध्ये झळकणार आहे. विक्रांत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
शीतल ठाकुर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, शीतल हिने ‘अपस्टार्ट्स’, ‘ब्रिज मोहन अमर रहे’ आणि ‘छप्पर फाड के’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सिनेमात शीतल आणि विक्रांत यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.