Mitali Mayekar | ‘आपली संस्कृतीचं ज्ञान..’; मिताली मयेकरचा बिकिनी फोटोशूट चर्चेत
'इथे बिकिनीवर अक्कल पाजाळणारे लोक तेच आहेत जे लपून लपून सगळं बघतील. तेव्हा यांची संस्कृती कुठे जाते काय माहित', असं एकाने ट्रोलर्सना सुनावलं. तर महाराष्ट्राची संस्कृती आणि तुझं काही देणं-घेणं नाही हे तर पोस्टवरून सिद्ध झालंच, असा टोमणा दुसऱ्या युजरने लगावला.
मुंबई : बॉलिवूड आणि बिकिनीचा वाद तर फार जुना आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्यात जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती, तेव्हा देशभरात तुफान वाद झाला होता. आता मराठी अभिनेत्री मिताली मयेकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनीतील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे. मितालीच्या बिकिनी लूकसोबतच तिच्या कॅप्शनची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेता आणि पती सिद्धार्थ चांदेकरसोबत ती नुकतीच स्पेनला गेली होती. स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावर क्लिक केलेला बिकिनीतील हा फोटो तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘मला ज्ञान पाजळू नका’
मराठी कलाकारांना अनेकदा त्यांच्या बोल्ड लूकवरून ट्रोल करण्यात येतं. याआधी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं जेव्हा मोनॉकिनीमध्ये फोटो पोस्ट केले होते. तेव्हा तिलासुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. म्हणूनच बिकिनीतील फोटो पोस्ट करताना मितालीने आधीच ज्ञान पाजळू नका, असं टीकाकारांना स्पष्ट केलं. मितालीने ऑरेंज बिकिनीच्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मी आज उठले आणि कॉन्ट्रोव्हर्सी निवडली. कमेंट सेक्शनमध्ये मला ‘आपली संस्कृती’चं ज्ञान देण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका, अशाने तुम्हाला तुमचीच लाज वाटेल.’
मितालीच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट बॉक्समध्ये काहींनी मितालीला बिकिनीवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी तिची बाजू घेतली आहे. ‘इथे बिकिनीवर अक्कल पाजाळणारे लोक तेच आहेत जे लपून लपून सगळं बघतील. तेव्हा यांची संस्कृती कुठे जाते काय माहित’, असं एकाने ट्रोलर्सना सुनावलं. तर महाराष्ट्राची संस्कृती आणि तुझं काही देणं-घेणं नाही हे तर पोस्टवरून सिद्ध झालंच, असा टोमणा दुसऱ्या युजरने लगावला.
View this post on Instagram
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने जेव्हा मोनॉकिनीमधले फोटो पोस्ट केले होते, तेव्हासुद्धा नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. अशा अंगवस्त्रांमुळे आजकालच्या मुली खूपच वाया जात आहेत. आधी कलाकारांनी आपलं सौंदर्य नीट सांभाळून ठेवा, मग जगासमोर उभे रहा, असं एकाने म्हटलं होतं. तर ‘ताई तुमच्या फोटोंमधून चुकीचा संदेश जातोय. मराठी संस्कृतीला हे शोभत नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं होतं. ‘सुंदरतेची व्याख्या फक्त नग्न फोटो असा ट्रेंड का होतोय? अंगभर कपड्यांमध्ये जी शालिनता, राजसपणा आहे तो वितभर बिकिनीत नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली होती.