फूटपाथवरचा मुलगा इतका मोठा सन्मान…, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती भावूक
Mithun Chakraborty: फूटपाथवरचा मुलगा इतका मोठा सन्मान..., सिनेविश्वातील सर्वात मोठा सन्मान मिळाल्यानंतर मिथुन दा भावूक, चाहते आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना म्हणाले..., सध्या सर्वत्र मिथुन दा यांची वक्तव्याची चर्चा
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला. 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण 8 ऑक्टोबर नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडला. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर मिथुन दा यांनी भावना व्यक्त केल्या. फूटपाथवरचा मुलगा इतका मोठा सन्मान मिळवू शकतो.. असा कधी विचार देखील केला नव्हता.. असं म्हणत मिथुन दा यांनी जुन्या आठवणी देखील ताज्या केल्या.
350 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आणि अनेक मानाचे पुरस्कार मिळवल्यानंतर मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘अद्यापही स्वीकार करु शकत नाहीये… फार मोठा सन्मान मिळाला आहे. देवाचे आभार व्यक्त करतो. असंख्य संकटांचा सामना केला, त्याचं देवाने गोड फळ दिलं आहे. डायलॉग दिले असते तर बोलू शकलो असतो. पण आता भाषण द्यायला सांगितलं आहे. काय बोलू कसं बोलू काहीही कळत नाहीये. फक्त एक गोष्ट आवर्जून सांगेल यापूर्वी तीन वेळा या मंचावर आलो आहे… तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालं आहे.
‘जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा अनेक जण मला म्हणाले अरे तुला पुरस्कार मिळाला. अनेक जण मला हिणवू लागले होते. दिग्दर्शक, निर्मात्याच्या ऑफिसमध्ये मला सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे मी सांगितलं माझ्या घरी स्क्रिप्ट पाठवून द्या. तेव्हा एका निर्मात्याने मला लाथ मारली आणि म्हणाला निघ येथून. तेव्हा मला कळलं बॉलिवूडमध्ये मला कोणी काम देणार नाही. माझा अभिनेता म्हणून स्वीकार नंतर करण्यात आला.’
‘माझ्या वर्णामुळे मला कोणी काम देणार नाही हे मला कळून चुकलं होतं. लोंकानी मला प्रचंड टोमणे मारले. रस्त्यावरून चालचाना मला म्हणायचे काळ्या चालला आहे. तेव्हा मी विचार केला मी स्वतःचा रंग तर बदलू शकत. देवाला मी सांगितलं मी रंग तर नाही बदलू शकत पण डान्स करु शकतो. त्यानंतर मी कधीच माझ्या पायांना थांबू दिलं नाही. अशात लोकं माझा रंग विसरले आणि मी झोली डस्की, बंगाली बाबू..’
पुढे मिथुन दा म्हणाले, ‘फूटपाथवरचा मुलगा इतका मोठा सन्मान मिळवू शकतो.. असा कधी विचार देखील केला नव्हता.. एक अशी व्यक्ती जी खरंच काहीही नव्हती. ज्याची कोणती ओळख नव्हती. त्याने सर्वकाही मिळवलं आहे. मी कायम माझ्या चाहत्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना एकच सांगायचं आहे, तुमचं ध्येय असेल तर तुम्ही आयुष्यात सर्वकाही मिळवू शकता…’ असं देखील मिथुन चक्रवर्ती म्हणाले.