मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन; अखेरच्या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं अमेरिकेत निधन झालं. हेलेना ल्यूक यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' या चित्रपटात काम केलं होतं. मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्नानंतर चार महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला होता.

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन; अखेरच्या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची पहिली पत्नी हेलेनाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 3:05 PM

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचं रविवारी अमेरिकेत निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. हेलेना यांनी 1985 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यरने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची पोस्ट शेअर केली आहे. हेलेना यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. हेलेना यांच्या शेवटच्या पोस्टचीही चर्चा होऊ लागली आहे. ‘खूप विचित्र वाटतंय, अनेक भावना मनात दाटून आल्या आहेत, हे कशामुळे होतंय माहीत नाही. दु:खी वाटतंय’ अशी त्यांची अखेरची पोस्ट होती. हेलेना या मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी होत्या. या दोघांचं लग्न फक्त चार महिनेच टिकलं होतं. त्यानंतर मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलेना या अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाशिवाय ‘एक नया रिश्ता’, ‘मेरे साथ चल’ आणि ‘दो गुलाब’ यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून हेलेना या अमेरिकेतच राहत होत्या. त्यांनी डेल्टा एअरलाइन्ससाठीही काम केलंय.

हेलेना या काही वर्षांपूर्वी ‘स्टारडस्ट’ मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत मिथुन यांच्यासोबतच्या लग्नाविषयी व्यक्त झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “हे माझं चार महिन्यांचं लग्न आता धुसर स्वप्नासारखं वाटतंय. ते झालं नसतं तर बरं झालं असतं असं मला वाटतं. माझ्यासाठी तोच बनला आहे, असा माझा ब्रेनवॉश त्याने केला होता. दुर्दैवाने त्यात तो यशस्वी झाला. मिथुन चक्रवर्तीशी लग्न करणं माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं होतं. त्यातून मी लवकराच लवकर बाहेर पडले, हे खूप बरं झालं. मीच या लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याकडे घटस्फोट मागितला. तो आता स्टार जरी असला तरी माझा निर्णय काही बदलणार नाही. तो या जगातला श्रीमंत व्यक्ती बनला तरी मी कधीच त्याच्याकडे परत जाणार नाही. मी त्याच्याकडे पोटगीही मागितली नाही. ते एक वाईट स्वप्न होतं आणि ते संपलंय. मिथुननेही माझ्याबद्दल बोलणं थांबवावं. मला त्याच्याबद्दल हीच गोष्ट आवडत नाही. मी त्याच्याबद्दल शेवटचं या मुलाखतीत बोलतेय. काही महिन्यात आमचा घटस्फोट निश्चित होईल आणि त्यानंतर तो काहीही करायला मोकळा असेल.”

हेलेना यांची अखेरची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत हेलेना पुढे म्हणाल्या होत्या, “त्याने जेव्हा मला सांगितलं की तो खरंच माझ्यावर प्रेम करतो तेव्हा मी त्याच्यावर विश्वास केला होता. पण जेव्हा मी त्याला नीट ओळखू लागले तेव्हा मला समजलं की तो फक्त त्याच्यावरच प्रेम करतो. तो खूपच बालिश आहे. मी त्याच्यापेक्षा लहान असले तरी समजूतदारपणाच्या बाबतीत मीच मोठी आहे, असं वाटतंय. तो खूपच पझेसिव्ह आहे आणि त्याने माझ्यावर एक्स बॉयफ्रेंडच्या भेटीचा आरोप केला. मी त्याला भेटले नाही हे समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा संशयी स्वभाव काही केल्या माघार घेण्यास तयार नव्हता. नंतर मला समजलं की माझ्या पाठीमागे त्याने माझी फसवणूक केली आणि त्यावर पडदा ओढण्यासाठी त्याने माझ्यावर खोटे आरोप केले.”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.