Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिथुन चक्रवर्तींसोबत लग्न एक वाईट स्वप्न…, अभिनेत्याच्या पहिल्या बायकोने सत्य सांगितलं तेव्हा…

Mithun Chakraborty First Wife: मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या बायकोचं अमेरिकेत निधन, मिथुन दा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर म्हणाल्या होत्या, 'मिथुन चक्रवर्तींसोबत लग्न एक वाईट स्वप्न, कारण त्यांनी...', एकेकाळी हेलेना ल्यूक यांनी देखील बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर केलेलं राज्य...

मिथुन चक्रवर्तींसोबत लग्न एक वाईट स्वप्न..., अभिनेत्याच्या पहिल्या बायकोने सत्य सांगितलं तेव्हा...
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 8:10 AM

Mithun Chakraborty First Wife: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी आणि अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचं निधन झालं आहे. अमेरिकेत हेलेना ल्यूक यांनी अखेरचा श्वास घेतला. हेलेना ल्यूक यांच्या निधनाची माहिती डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. हेलेना ल्यूक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक छोट्या – छोट्या भूमिका त्यांनी बॉलिवूड सिनेमांमध्ये साकारल्या. हेलेना यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. पण त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

रविवारी फेसबूकवर केले शेवटची पोस्ट…

हेलेना यांनी रविवारी सकाळ 9 वाजता शेवटची फेसबूक पोस्ट केली. शेवटची पोस्ट करत हेलेना म्हणाल्या होत्या, ‘विचित्र वाटत आहे… संमिश्र भावना सतत मनात येत आहेत आणि कळत नाही काय होत आहे… मनात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे…’ अशी पोस्ट हेलेना यांनी मृत्यूच्या आधी लिहिली…

मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी होत्या हेलेना

मिथुन चक्रवर्ती यांचं पहिलं लग्न हेलेना यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हेलेना आणि मिथुन लग्नानंतर फक्त 4 महिने एकत्र राहिले. दरम्यान, एका मुलाखतीत हेलेना यांनी मिथुन यांच्यासोबत लग्न म्हणजे वाईट स्वप्न… असं वक्तव्य केलं होतं.

मुलाखतीत हेलेना म्हणाल्या होत्या, ‘मिथुन यांच्या सोबत लग्न केलं नसतं तर… हाच विचार मी आता करते. मी तुझ्यासाठी योग्य पुरुष आहे… असा विश्वास पटवून देण्यासाठी त्यांनी माझं ब्रेनवॉश केलं आणि ते यशस्वी ठरले… पण सत्य परिस्थिती वेगळी होती. मी आता कधीच त्याच्याकडे परतणार नाही. ते श्रीमंत व्यक्ती असले तरी मी पोटगी मागितली नाही. त्यांच्यासोबत लग्न फक्त वाईट स्वप्न होतं…’ असं देखील हेलेना म्हणाल्या होत्या.

रिपोर्टनुसार, मिथुन यांनी हेलेना यांच्या वडिलांना वचन दिलं होतं की, ‘तुमच्या मुलीला मी जगातील 9 वं आश्चर्य म्हणून वागणूक देईल…’ यावर हेलेना म्हणाल्या होत्या, ‘मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. ते सतत म्हणायचे मी तुझ्यावर प्रेम करतो… पण असं काहीही नव्हतं… ते माझ्यापेक्षा मोठे होते आणि मी लहान होती…’ असं देखील हेलेना म्हणाल्या होत्या.

हेलेना ल्यूक यांचे सिनेमे

हेलेना यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्द’ सिनेमामुळे हेलेना यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमात हेलेना यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. ‘दो गुलाब’, ‘आओ प्यार करें’ आणि ‘साथ साथ’ सिनेमात देखील हेलेना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.