Mithun Chakraborty Hospitalised: मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty Hospitalised: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Mithun Chakraborty Hospitalised: मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 12:04 PM

Mithun Chakraborty Hospitalised: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाहीत. दुसरीकडे ही बातमी पसरताच मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिथुनदा बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील पहिला फोटो देखील समोर आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृती चर्चा सुरु आहे. पण मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. पण रुग्णालयाकडून देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बातमीनंतर, मिथुनदा यांचे चाहते चिंतेत आहेत आणि त्याच्या प्रकृतीशी संबंधित माहितीची वाट पाहत आहेत आणि ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित

मिथुन चक्रवर्ती यांनी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक पुरस्कारांनी देखील त्यांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘मला अभिमान आहे. पुरस्कार मिळवून मी आनंदी आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो…’

‘मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितलं नाही. न मागता काहीतरी मिळाल्याची भावना आज जाणवते. ती पूर्णपणे वेगळी भावना आहे. खूप छान भावना आहे.’ असं देखील मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते. पण आता मिथुन चक्रवर्ती त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.