सुष्मिता सेन हिच्यासोबत इंटीमेट सीन दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले मिथुन चक्रवर्ती; गंभीर आरोपांमुळे सर्वत्र खळबळ
मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इंटीमेट सीनचा सुष्मिताला होतोय पश्चाताप... अभिनेत्रीने दिग्दर्शकांना घडलेला प्रकार सांगितला, सध्या सर्वत्र मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन यांची चर्चा...

मुंबई : बॉलिवूडमधून अनेक चांगल्या वाईट घटना समोर येत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींचे अफेअर, वाद, ब्रेकअप यासोबतच सेलिब्रिटी सिनेमात दिलेल्या इंटीमेट सीन आणि किसिंग सीनमुळे देखील तुफान चर्चेत असतात. ज्यामुळे अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप देखील करण्यात आले. काही वेळा अभिनेते त्यांच्या भूमिकेमध्ये इतके गुंतून जातात की ज्यामुळे त्यांच्या वास्तविक जीवनात अत्यंत अडचणीत येतात. अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. ज्यामुळे मिथुन चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकले होते… जेव्हा अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने मिथुन चक्रवर्ती यांच्यावर गंभीर आरोप केले होते, तेव्हा अभिनेत्याला मोठा धक्का बसला होता.
हे प्रकरण आहे २००६ मधील.. जेव्हा मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन एकत्र ‘चिंगारी’ सिनेमाचं शुटिंग करत होते. सिनेमात दोघांनी एक इंटिमेट सीन शूट केला होता. दोघांमध्ये एक बलात्काराचा सीन होता. दिग्दर्शकांना देखील त्यांना हवा होता तसा शॉट मिळाला. पण दुसरीकडे अभिनेत्री सुष्मिता आनंदी नव्हती.. सीनमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी वाईट प्रकारे स्पर्ष केल्याची भावना अभिनेत्रीच्या मनात होती.
सीन फायनल झाल्यानंतर सुष्मिता सेटवरून तात्काळ निघून गेली. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना दिग्दर्शक कल्पना लाझमी यांना सांगितल्या. हा फक्त गैरसमज आहे.. असं म्हणत सुष्मिताचं बोलणं दिग्दर्शकांनी टाळलं.. अभिनेत्रीने देखील यावर अधिक लक्ष दिलं नाही..



काही वेळाने ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरू लागली. पण, परिस्थिती आणखी बिघडण्याआधी, सुष्मिताने देखील स्वीकारलं की ती मिथुन यांच्याबद्दल अभिनेत्रीने चुकीचा विचार केली होता. तिने अभिनेत्याशी असलेला हा गैरसमज दूर करणं योग्य मानलं आणि गोष्टी तिथेच संपल्या.
बॉलिवूडमध्ये स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करत असताना अभिनेत्याने अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना केला.. मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या.. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ सिनेमातून मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सिनेमातूनच मिथुन चक्रवर्ती यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली..
‘मृगया’ सिनेमासाठी मिथुन चक्रवर्ती यांना नॅशनल पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. पहिल्या सिनेमातून लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज मिथुन चक्रवर्ती बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत.
सुष्मिता सेन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्या केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.