‘या’ मराठी चित्रपटासाठी मनसे पुन्हा एकदा मैदानात; दिला इशारा

मराठी चित्रपटांसंबंधित अनेक समस्या आजवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने उचलून धरल्या आहेत. मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये शोज मिळत नसल्यास, त्यांची पायरसी होत असल्यास मनसेनं आवाज उठवला आहे. आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटासाठी मनसे मैदानात उतरली आहे.

'या' मराठी चित्रपटासाठी मनसे पुन्हा एकदा मैदानात; दिला इशारा
Raj ThackerayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 1:33 PM

‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा मराठी चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शित होताच या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसे शोज मिळत नसल्याची तक्रार असतानाच पायरसीमुळे चित्रपटाच्या व्यवसायात मोठं नुकसान सहन करावं लागतं. याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना मैदानात उतरली आहे. निर्माते संदिप देशपांडे, अभिनेते अतुल परचुरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. पायरसीविरोधात सायबर सेलकडे तक्रार नोंदवल्याचं त्यांनी परिषदेत सांगितलं. त्याचसोबत मराठी चित्रपट किंवा नाटक हे थिएटरमध्येच जाऊन बघा, असं आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केलंय.

“गेल्या काही वर्षांत हा विषय आम्ही थांबवला होता. पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची पायरसी सुरू झाली आहे. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या चित्रपटाची पायरसी झाली आहे. हा चित्रपट प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवला जात आहे. सर्व मराठी रसिक प्रेक्षकांना माझी विनंती आहे की कृपा करून मराठी चित्रपट आणि मराठी नाटक हे चित्रपटगृहातच जाऊन पहा. पायरेटेड चित्रपट मोबाईलवर येतो म्हणून तो पाहू नका. संदीप देशपांडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांच्याच बाबतीत असं घडलंय. असं जर झालं तर ते भविष्यात पुन्हा चित्रपटनिर्मिती करतील का? काल संदीप देशपांडे यांनी मुंबई पोलीसचे विशेष आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे याबद्दल तक्रार केली आहे,” अशी माहिती अमेय खोपकरांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“मराठी चित्रपटांचा बजेट हा हिंदी चित्रपटांइतका नसतो. असं असतानाही जाणीवपूर्वक मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज व्हावी म्हणून काही शक्ती काम करत आहे का? मराठी चित्रपट चालले नाही पाहिजेत म्हणून कुठलं षडयंत्र रचलं जातंय का? याचा तपास व्हावा म्हणून देवेन भारती यांना भेटून तक्रार केली. अशा कोणत्या शक्ती काम करत असतील तर त्यांना रोखण्याचं काम करावं अशी आम्ही विनंती केली. असे लोक जर आम्हाला सापडले तर त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देऊ,” असा इशारा मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

मराठी चित्रपटांविषयीचे दोन मुद्दे घेऊन लवकरच सरकार दरबारी जाणार असल्याची माहिती अमेय खोपकरांनी या पत्रकार परिषदेत दिली. “सेन्सॉरशिपपासूनच मराठी चित्रपटांची गळचेपी सुरू होते. सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मराठी चित्रपटांना प्रचंड त्रास दिला जातो. ज्यांना मराठी कळत नाही, ज्यांना मराठी समजत नाही असे परीक्षक सेन्सॉर बोर्डात बसले आहेत. हे दोन विषय घेऊन आम्ही लवकरच सरकार दरबारी जाणार आहोत,” असं त्यांनी सांगितलं. तर “प्रेक्षकांनी थिएरटमध्ये जाऊनच चित्रपट पहावा. त्यामुळे आम्हालादेखील काम करण्यासाठी हुरूप येतो”, असं अभिनेते अतुल परचुरे म्हणाले.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.