‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्यावर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप; पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्याच्या अडचणींमध्ये वाढ; आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर एक्स गर्लफ्रेंडने अभिनेत्यावर केले गंभीन आरोप.. पाहा तिची वादग्रस्त पोस्ट...
मुंबई : ‘साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya) फेम अभिनेता मोहम्मद नझीम खिलजी (Mohammad Nazim Khilji) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मोहम्मद नझीम खिलजी ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत ‘अहम मोदी’ या भूमिकेत झळकला होता. त्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण आता एक्स गर्लफ्रेंडने केलेल्या आरोपांमुळे अभिनेता चर्चेत आला आहे. मोहम्मद नझीम खिलजी याची एक्स गर्लफ्रेंड शायना सेठ हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. शायना हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत शायना हिने एक्स बॉयफ्रेंडसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला आहे.
मोहम्मद नझीम खिलजी आणि टेरो कार्ड रीडर शायना सेठ गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या नात्याची सुरुवात 2011 सली झाली. त्यानंतर २०१९ साली त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला. पण आता अनेक वर्षांनंतर शायना सेठ हिने एका मुलाखतीत अभिनेत्यावर गंभीर आरोप करत नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत शायना हिने नझीम याच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत. मी स्वतः नझीम याच्यासोबत ब्रेकअप केलं असं शायना म्हणाली आहे. रिलेशनशिपमध्ये असताना अनेक मुलींनी शायना हिला नझीम फसवणूक करत असल्याचं सांगितलं. पण नातं टिकवण्यासाठी ती कायम अभिनेत्याला माफ करायची.
पोस्टमध्य शायना म्हणाली, ‘मी नझीम याला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं आहे. आमच्या दोघांमध्ये असलेले वाद मिटवण्यासाठी त्याने माझ्या आईला फोन केला होता. पण मला पुन्हा नझीम याच्यासोबत असलेलं नातं नको आहे. आठ वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये फक्त एक वर्ष गोष्टी ठिक होत्या. त्यानंतर आमचं नातं फक्त आणि फक्त नावासाठी होतं..’ असं शायना म्हणाली.
शायना हिने केलेल्या गंभीर आरोपांनंतर याबद्दल अभिनेता मोहम्मद नझीम खिलजी विचारण्यात आलं. पण अभिनेत्याने यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. सध्या अभिनेता दिग्दर्शक फराह कादर (Farrah Kader) हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण त्याने नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केलेला नाही.
मोहम्मद नझीम खिलजी याला ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली असली तरी, ‘कुंडली भाग्य’, ‘लाल इश्क’, ‘उडान’, ‘रूप- मर्द का नया स्वरूप’, ‘बहू बेगम’यांसारख्या मालिकांमध्ये देखील अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.