मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपाने खळबळ, मोहनलाल यांचा राजीनामा

मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या तणाव दिसून येत आहे. कारण अनेक महिला कलाकारांनी आपल्या सहकलाकारांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा करण्यास सुरुवात केली आहे.

मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपाने खळबळ, मोहनलाल यांचा राजीनामा
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 6:55 PM

हेमा समितीच्या अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात महिलांच्या छळाचे अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून आता इतर महिला कलाकारही लैंगिक छळाचे आरोप घेऊन पुढे येत आहेत. मल्याळम चित्रपट क्षेत्रात महिलांच्या कामाच्या परिस्थितीबाबत हेमा समितीने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल समोर येताच आता मल्याळम चित्रपट कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुपरस्टार मोहनलाल यांनीही राजीनामा दिला आहे.

मोहनलाल यांच्या नेतृत्वाखालील मल्याळम फिल्म असोसिएशनने राजीनामा दिला आहे. मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलाल आणि त्यांच्या 17 सदस्यीय समितीने 27 ऑगस्ट रोजी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. एएनआयने ट्विट करून मोहनलाल आणि १७ सदस्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.मोहनलाल यांच्यासह सर्व 17 कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

अभिनेते, निर्माते यांच्यावर छळाचे आरोप

महिला कलाकारांनी समितीच्या काही सदस्यांवर छळाचा आरोप केला होता, त्यानंतर मोहनलाल आणि संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांची समिती मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी विसर्जित करण्यात आली. 19 ऑगस्ट रोजी हेमा समितीचा अहवाल लोकांसमोर आल्यापासून अनेक महिला कलाकारांनी अभिनेते, निर्माते यांच्यावर छळाचे आरोप करत आहेत.

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधून महिलांच्या तक्रारी आणि आरोप समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या कामाच्या परिस्थितीवरील हेमा समितीच्या अहवालात शारीरिक शोषणापासून ते वेतन असमानतेपर्यंतच्या १७ प्रकरणांचा उल्लेख करण्यात आलाय. हा अहवाल समोर आल्यानंतर मोहनलाल यांच्याआधी दोन जणांनी मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी, मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (एएमएएमए) सरचिटणीस असलेले सिद्दिकी आणि केरळ स्टेट फिल्म अकादमीचे अध्यक्ष फिल्म आयकॉन रंजित यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता.

नवीन कार्यकारणी बनवणार

लवकरच नवीन नियामक मंडळाची निवड करण्यात येईल, असे निवेदनही असोसिएशनने प्रसिद्ध केले आहे. असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला आशा आहे की AMMA ला एक नवीन नेतृत्व मिळेल जे असोसिएशनचे नूतनीकरण आणि मजबूत करण्यास सक्षम असेल. टीका आणि सुधारणांसाठी सर्वांचे आभार. नवीन नियामक मंडळाची निवड करण्यासाठी दोन महिन्यांत सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही असोसिएशनने कळवले आहे.

जगदीश, जयन चेरथला, बाबुराज, कलाभवन शाजॉन, सूरज वेंजारामूडू, जॉय मॅथ्यू, सुरेश कृष्णा, अनन्या, विनू मोहन, टोविनो थॉमस, सरयू, अंसिबा, जोमोल आणि टिनी टॉम या समितीचा भाग होते, जी आता विघटित करण्यात आली आहे. आरोप आणि हेमा समितीच्या अहवालाबाबत AMMA च्या मौनावर जनता आणि चित्रपट जगतातील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

हेमा समितीच्या अहवालात मल्याळम चित्रपट उद्योगातील छळ, कास्टिंग काउच, वेतनातील असमानता, शोषण आणि लॉबिंग या समस्या समोर आल्या आहेत. अनेक धक्कादायक प्रकरणे अहवालात समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांनी अनेक ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांवर छेडछाडीचे आरोप केले आहेत.

कोणाकोणावर छळाचे आरोप

अभिनेता सिद्दीकी हे AMMA चे सरचिटणीस होते. एका महिला अभिनेत्रीने त्यांच्यावर छेडछाड केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सिद्दिकीशिवाय चित्रपट निर्माते रंजीत, तुलसीदास, अभिनेते जयसूर्या, मुकेश, मणियंपिला राजू, एडावेला बाबू आणि सूरज वेंजारामूडू या सेलिब्रिटींवरही महिला अभिनेत्रींनी आरोप केले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.