Ileana D’Cruz | इलियानाने पोस्ट केला तिच्या होणाऱ्या बाळाच्या पिताचा फोटो; तरीही नेटकरी ओळखूच शकेना!

गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. त्यामुळे बाळाचा होणारा पिता हा सेबॅस्टियन तर नाही ना, असाही सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

Ileana D'Cruz | इलियानाने पोस्ट केला तिच्या होणाऱ्या बाळाच्या पिताचा फोटो; तरीही नेटकरी ओळखूच शकेना!
Ileana D'Cruz
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 9:17 AM

मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या गरोदरपणामुळे सध्या चर्चेत आहे. गरोदरपणाच्या या काळाचा ती पुरेपूर आनंद घेत असून चाहत्यांसोबत विविध फोटो शेअर करतेय. सुरुवातीला नेटकऱ्यांनी इलियानाच्या होणाऱ्या बाळाच्या पिताविषयी बरेच प्रश्न विचारले होते. मात्र तिने ‘मिस्ट्री मॅन’चा फोटो पोस्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. असं असलं तरी इलियानाचा पती नक्की कोण आहे, हा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण तिने आतापर्यंत त्याच्यासोबत जे काही फोटो पोस्ट केले, त्यातल्या कोणत्याही फोटोत चेहरा स्पष्ट पहायला मिळाला नाही. आता पुन्हा एकदा इलियानाने तिच्या ‘मिस्ट्री मॅन’चा आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.

इलियानाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड पाळीव श्वानासोबत खेळताना दिसतोय. ‘पपी लव्ह’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोतही तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा पूर्णपणे दिसत नाहीये. कारण श्वानाला किस करण्यासाठी त्याने मान खाली केली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहतीने तिला गरोदरपणात वाढणाऱ्या वजनाविषयी प्रश्न विचारला.

हे सुद्धा वाचा

चाहतीच्या प्रश्नावर उत्तर देताना इलियानाने लिहिलं, ‘गेल्या काही महिन्यात माझ्या शरीरात जे काही बदल झाले, त्यावर मी प्रेम करू लागले. हा संपूर्ण प्रवास खूप सुंदर आहे. मी सुद्धा माणूसच आहे, त्यामुळे असे काही दिवस असतात, तेव्हा मला ठीक वाटत नाही. पण माझी साथ देणारे लोक खूप चांगले आहेत. त्यामुळे वाढलेलं वजन ही माझ्यासाठी आता समस्या नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा.’

गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. त्यामुळे बाळाचा होणारा पिता हा सेबॅस्टियन तर नाही ना, असाही सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. इलियाना बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर इलियानाचं नाव कतरिनाच्या भावाशी जोडलं गेलं. मात्र या दोघांनी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नाही.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.