मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) ही तूफान चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिचे नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. जॅकलीन फर्नांडीस ही सुकेश चंद्रशेखर याच्यावर आंधळे प्रेम करत होती. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) दिल्ली येथे तुरुंगात आहे. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिचे अनेकदा चाैकशी ही करण्यात आली. जॅकलीन फर्नांडीस हिच नाही तर या प्रकरणात नोरा फतेही हिचे नाव देखील आले. नोरा फतेही हिला देखील सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने अत्यंत महागडे गिफ्ट दिले आहेत.
200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांनी बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिला देखील सह आरोपी या प्रकरणात केले आहे. जॅकलीन फर्नांडीस हिचा पासपोर्ट हा कोर्टाने जप्त केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून जॅकलीन फर्नांडीस ही विदेशात जाऊ शकत नाहीये. जॅकलीन फर्नांडीस ही विदेशात गेली तर परत ती भारतामध्ये येणार नसल्याची देखील चर्चा आहे.
यामुळेच जॅकलीन फर्नांडीस हिचा पासपोर्ट हा जप्त करण्यात आलाय. आज जॅकलीन फर्नांडीस हिने कामानिमित्त विदेशात जावे लागत असल्याने विदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. जॅकलिन आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. परदेशात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जॅकलीन फर्नांडीस हिने न्यायालयाकडे केली आहे.
200 कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिचे पाय खोलात असल्याचे अगोदर स्पष्ट झाले आहे. कारण जॅकलीन फर्नांडीस ही सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. इतकेच नाही तर जॅकलीन फर्नांडीस हिला सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न देखील करायचे होते. काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखर याने सांगितले होते की, जॅकलीन फर्नांडीस हिला माझ्या कामाबद्दल काहीच माहिती नव्हती.
जॅकलीन फर्नांडीस ही फक्त माझ्यावर प्रेम करायची, तिने माझ्या पैशांवर कधीच प्रेम केले नाहीये. काही दिवसांपूर्वीच जॅकलीन फर्नांडीस हिने अत्यंत मोठा खुलासा करत सांगितले की, सुकेश चंद्रशेखर हा कोणत्या मार्गाने पैसे कमावत होता, याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याच्या पैशांसोबत माझा काहीच संबंध नसल्याचे जॅकलीन फर्नांडीस हिने यापूर्वीच जाहिर केले होते. जॅकलीन फर्नांडीस हिला सुकेश चंद्रशेखर याने अनेक मोठे गिफ्ट दिले आहेत.