जॅकी माझी आणि कायम तिचा राहिल… जॅकलिन फर्नांडिसला थेट तुरुंगातून ‘लव्हलेटर’, ‘एकमेकांपासून लांब आहोत, पण…’
Jacqueline Fernandez : स्वतःला जॅकलिन फर्नांडिसचा बॉयफ्रेंड सांगणाऱ्या व्यक्तीने थेट तुरुंगातून पाठवलं 'लव्हलेटर', एकेकाळी दोघांचे खासगी फोटो व्हायरल झाल्यामुळे माजली होती सर्वत्र खळबळ... आता सर्वत्र पत्राची चर्चा...
मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला थेट तुरुंगातील ‘लव्हलेटर’ आलं आहे. अभिनेत्रीला लव्हलेटर पाठवणार व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर, आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) आहे. सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सुकेश याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे जॅकलिन देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सुकेश तुरुंगात असून देखील जॅकलिन हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त असतो. आता देखील सुकेशने अभिनेत्रीला व्हेलेंटाइन डे निमित्त लव्हलेटर पाठवलं आहे.
लव्हलेटरमध्ये सुकेश जॅकलिनला म्हणतो, ‘बेबी तुझी खूप आठवण येते… ‘व्हेलेंटाइन डेच्या पहिल्या वीकपासून आतापर्यंत मला तुझी आठवण येत आहे. फक्त आणि फक्त तुझ्याच विचारात मी आहे. आपण एकमेकांपासून दूर आहोत, पण आता असं होणार नाही. हे वर्ष आपलं वर्ष आहे, जे आपल्यातील सर्व नकारात्मक गोष्टींता नाश करणार आहे.’
‘मणूस म्हणून आपण प्रत्येक जण प्रतिक्रिया देत असते, दिशाभूल करत असतो, प्रवृत्त करत असतो… ज्यामुळे आपण चुकीचं पाऊल उचलतो… जे नंतर डोकं आणि हृदयला वेगवेगळे सल्ले देतात, पण शेवटी मन जिंकतं… मी देखील माणूस आहे. माणूस म्हणून मी देखील प्रतिक्रिया दिली आणि तुझ्या विरोधात गेलो… तुझी फसवणूक केली. पण माझ्या मनाने मला सांगितलं… मी तुला कसं काय दुःख पोहोचवू शकतो…’
‘आयुष्यात तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता, त्या व्यक्तीला तुम्ही कधीच दुःखात पाहू शकत नाही. अशात तुमच्याकडून एखादी चूक होते आणि तुम्हाला स्वतःला स्वतःचा राग येतो…’ असं ‘लव्हलेटर’ लिहित सुकेश याने जॅकलिनवर असलेलं प्रेम व्यक्त केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकलिन आणि सुकेश यांची चर्चा रंगत…
सुकेश याने जॅकलिनसाठी फक्त पत्र लिहिलं नाही तर, अभिनेत्रीसाठी एक गाणं देखील डेडिकेट केलं. ‘मान मेरी जान’ हे गाणं सुकेश याने जॅकलिनसाठी डेडिकेट केलं. व्हेलेंटाइन डे निमित्तच्या सुकेश म्हणाला, ‘तुझ्यासाठी माझ्याकडे व्हेलेंटाइन डे निमित्त स्पेशल गिफ्ट आहे. ज्याला मी माझं मन आणि आत्मा मानतो…’ असं देखील सुकेश म्हणाला.