भररस्त्यात पत्नीला बेदम मारहाण, मेडिकल रिपोर्टमुळे सर्वत्र खळबळ, विवेक बिंद्रा यांचं मोठं सत्य समोर
Vivek Bindra : विवेक बिंद्राच्या पत्नीने मेडिकल रिपोर्ट समोर... लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पत्नीला मारहाण, भररस्त्यात पत्नीसोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल... विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात
मुंबई | 27 डिसेंबर 2023 : पत्नीला मारहाण प्रकरणी मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवेक बिंद्रा याने पत्नीला मारहाण केल्यानंतर यानिका हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता विवेक याच्या पत्नीचे मेडिकल रिपोर्ट समोर आले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार, यानिका हिच्या नातेवाईकांनी मेडिकल रिपोर्ट पोलिसांना दिले आहे. रिपोर्टमध्ये यानिका हिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
रिपोर्टनुसार, याप्रकरणी पोलिसांनी विवेकच्या आईशी संपर्क साधला आहे. विवेकच्या आईची चौकशी केल्यानंतर घटनेच्या दिवशीची माहिती देखील पोलिसांना मिळाली. पत्नीसोबत झालेल्या वादाच्या वेळी विवेकची आई तेथेच उपस्थित होत्या. एवढंच नाही तर, पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतले आहेत.
व्हिडीओ बनवणाऱ्या शोधात पोलीस
सोसायटीमध्ये पत्नीला मारहाण करताना विवेक बिंद्रा याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या याप्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे. विवेक बिंद्रा यांची पत्नी यानिका गंभीर जखमी आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मेडिकल रिपोर्ट आणि सीसीटीव्हीमुळे मोटिव्हेशनल स्पीकरच्या अडचणी वाढू शकतात. मात्र, मोटिव्हेशनल स्पीकरवर कारवाई करण्यासाठी पोलीस सर्व कायदेशीर बाबी तपासत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. शिवाय, पोलीस कायदेतज्ज्ञांची मते घेत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
विवेक बिंद्रा याआधी देखील अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे. विवेक बिंद्रा याने पहिल्या पत्नीसोबत देखील गैरवर्तन केलं होतं. ज्यामुळे विवेक याच्या कोर्टाची पायरी चढावी लागली होती. दुसऱ्या पत्नीला देखील मारहाण केल्यामुळे विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा आणि यानिका यांचं लग्न 6 सप्टेंबर 2023 रोजी झालं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक बिंद्रा याच्या कृत्याची चर्चा रंगली आहे.