मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या थक्क करणाऱ्या आहेत. अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) यांच्या आयुष्यात देखील अनेक चढ-उतार आले. एक काळ असा होता, जेव्हा मौसमी चटर्जी बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक होत्या. मौसमी चटर्जी यांनी त्यांच्या काळात बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं असलं तरी, मौसमी चटर्जी यांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ज्यातून त्या आजही सावरल्या नाहीत. मौसमी चटर्जी यांनी लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करियर उच्च शिखरावर असताना मौसमी चटर्जी यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला.
मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee Marriage) यांचं लग्न वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांच्या मर्जीने झालं. लग्नानंतर १६ व्या वर्षी लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने १८ व्या वर्षी मुलीला जन्म दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रोटी कपडा मकान’ सिनेमादरम्यान मौसमी प्रेग्नेंट होत्या.
आई झाल्यानंतर मौसमी चटर्जी यांची लोकप्रियता हळू – हळू कमी होवू लागली. पण मौसमी चटर्जी यांनी जेवढ्या सिनेमांमध्ये काम केलं, ते सगळे सिनेमे हिट ठरले. आजही मौसमी चटर्जी यांच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. झगमगत्या विश्वापासून दूर झाल्यानंतर मौसमी चटर्जी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
करियरच्या सुरुवातीला मुलीला जन्म दिल्यांमुळे माझं करियर संपलं असा लोकांचा समज होता. पण असा विचार मौसमी चटर्जी यांनी कधीही केला नाही. प्रोफेशनल आयुष्यासाठी त्यांनी कधीही खासगी आयुष्याला दोष दिला नाही. पण मुलीच्या निधनानंतर मौसमी चटर्जी यांना मोठा धक्का बसला.
सांगायचं झालं तर, मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee Daughters) यांनी दोन मुलींना जन्म दिला होता. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव पायल मुखर्जी होतं तर दुसऱ्या मुलीचं नाव मेघा मुखर्जी आहे. पायल घरातील मोठी मुलगी आसल्यामुळे मौसमी यांच्या फार जवळ होती.
पण २०१९ मध्ये पायलचं निधन झाल्यानंतर मौसमी चटर्जी यांना मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून चटर्जी आजही सावरल्या नाहीत. रिपोर्टनुसार, मौसमी चटर्जी मुलगी पायल हिची कायम काळजी करत असायच्या. मुलीची काळजी घेत नसल्यामुळे त्यांनी जावयावर केस देखील दाखल केली होती. पण मुलीच्या निधनानंतर त्यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला.