मी जया बच्चनपेक्षा..; मौसमी चॅटर्जी काय बोलून गेल्या? व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना अभिनेत्री जया बच्चन यांना टोला लगावला आहे. फोटोसाठी पोझ देण्याची विनंती पापाराझी जेव्हा करत होते, तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, मी जया बच्चनपेक्षा..

मी जया बच्चनपेक्षा..; मौसमी चॅटर्जी काय बोलून गेल्या? व्हिडीओ होतोय व्हायरल
Jaya Bachchan and Moushumi ChatterjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 8:12 AM

मुंबई : 15 मार्च 2024 | बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या नुकत्याच मुंबईतल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. मात्र पापाराझी जेव्हा त्यांना “उजवीकडे पहा, डावीकडे पहा” अशा सूचना देत होते, तेव्हा मौसमी चॅटर्जी थोड्या वैतागल्या. मात्र फोटोग्राफर्ससमोर त्यांनी संयमाने पोझ दिले. यावेळी एका मैत्रिणीने जेव्हा त्यांची तुलना अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी केली, तेव्हा त्या लगेच पापाराझींकडे बघत म्हणाल्या, “मी जया बच्चनपेक्षा चांगली व्यक्ती आहे.” यानंतर त्या पापाराझींचं कौतुक करू लागतात. “जर तुम्ही लोक नसते तर आम्ही कुठे असतो. तुमच्याशिवाय आमचं काही अस्तित्व नाही”, असं म्हणत त्यांनी जया यांच्यावर पुन्हा अप्रत्यक्ष निशाणा साधला. जया बच्चन या नेहमीच त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात.

जया बच्चन यांना कॅमेरा आणि मीडिया यांच्याविषयी फार प्रेम नसल्याचं अनेकदा पहायला मिळालं. त्यांच्यासमोर जेव्हा कधी पापाराझी जातात, तेव्हा त्या नेहमीच चिडलेल्या दिसतात. अनेकदा त्यांना फोटोग्राफर्सवर ओरडतानाही पाहिलं गेलं आहे. अशा लोकांना नोकरीवरून काढा, असंही त्या एकदा पापाराझींसमोर म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा चिडका स्वभाव पाहून फोटोग्राफर्स आणि पापाराझी त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी खुलासा केला होता की गुलजार दिग्दर्शित ‘कोशिश’ या चित्रपटात त्यांची जागा जया बच्चन यांनी घेतली होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मौसमी यांनी तीन दिवस शूटिंगसुद्धा केली होती. त्यानंतर त्यांची भूमिका जया यांना देण्यात आली होती. याविषयी सांगताना मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “मी तीन दिवस शूटिंग केलं होतं आणि त्या दिवसांत कशी फसवणूक केली गेली ते मला दिसत होतं. मी जया बच्चन यांच्या सेक्रेटरीला पाहीलं होतं. ती तिथे सकाळपासून रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये असायची. अचानक गुलजार दा यांनी मला सांगितलं की उद्यापासून तुला रात्री उशिरापर्यंत शूटिंगसाठी थांबावं लागेल. त्यावेळी मी नुकताच बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे मी त्यांना नकार दिला. मी फक्त एकाच शिफ्टमध्ये काम करू शकते, असं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी मला सर्वांसमोर सुनावलं की, तुझी जागा घेण्यासाठी अनेक अभिनेत्री तयार आहेत हे तुला माहितीये का? हे ऐकताच माझा पारा चढला आणि मी म्हणाले की, ठीक आहे. मग तुम्ही त्यांनाच घ्या.” मौसमी चॅटर्जी या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिकू’ या चित्रपटात झळकल्या होत्या. शूजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.