टँकर नाही, ढगातून पडणाऱ्या खऱ्याखुऱ्या पावसात असं शूट झालं होतं, रिमझिम गिरे सावन
गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला. या व्हिडीओमध्ये एक जोडपे हे रिमझिम गिरे सावन या गाण्यावर खास डान्स करताना दिसले. हा व्हिडीओ व्हिडीओ सर्वात अगोदर सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी शेअर केला.
मुंबई : बाहेर सुरू असणारा पाऊस आणि चहा घेत रिमझिम गिरे सावन (Rimjhim Gire Sawan) हे गाणे ऐकण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला की, सर्वांना सर्वात अगोदर रिमझिम गिरे सावन या गाण्याची आठवण होते. नुकताच काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील एका वयस्कर जोडप्याने रिमझिम गिरे सावन या गाण्याचे शूटिंग (Shooting) त्याचठिकाणी केले, ज्याठिकाणी अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी यांनी खरोखरच्या गाण्याचे शूटिंग केले होते. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून सर्वांना चित्रपटातील खऱ्या गाण्याची आठवण झाली. या वयस्कर जोडप्याचा व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. आनंद महिंद्रा यांनी देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
विशेष म्हणजे ठाण्यातील या वयस्कर जोडप्याचा व्हिडीओ पाहून मौसमी चटर्जीने काही जुन्या आठवणी या ताज्या केल्या. मौसमी चटर्जी यांनी तर अगोदर हेच स्पष्ट केले की, मला या वयस्कर जोडप्याचा व्हिडीओ पाहून खूप जास्त छान वाटले. जेंव्हा आपल्या एखाद्या गाण्यावर प्रेक्षक अशाप्रकारचे व्हिडीओ तयार करतात ते कायमच कलाकारांना आवडते.
पुढे मौसमी चटर्जी या त्यांच्या रिमझिम गिरे सावन या गाण्याचे शूटिंग हे रिअलमध्ये कशाप्रकारे करण्यात आले हे सांगताना दिसल्या. मौसमी चटर्जी म्हणाल्या की, मुळात म्हणजे रिमझिम गिरे सावन या गाण्याचे शूटिंग आम्ही खऱ्याखुऱ्या पावसामध्ये केले आहे. त्यासाठी कोणते टँकर किंवा फवारे वापले नाहीत. ज्यावेळी पाऊस पडायचा त्यावेळी गाण्याची शूटिंग केली जात होती.
पुढे मौसमी चटर्जी म्हणाल्या की, मुळात म्हणजे ज्यावेळी गाण्याचे शूटिंग हे सुरू होते त्यावेळी गाणे नसायचे. आम्हाला फक्त सीन करायचे होते. गाण्याचे सीन शूट करत असताना निर्मात्यांच्या हातामध्ये एक रूम होता आणि तो रूमाल खाली पडला की, कळायचे की हा सीन झाला असून आता पुढचा करायचा आहे.
आमच्या गाण्याच्या शूटिंगचे सर्व गणित हे पावसावर आधारित होते. पाऊस थांबला की, आम्हाला पण थांबाले लागायचे. मुळात म्हणजे सर्व टिमला हे माहिती होते की, पाऊस आला की, लगेचच पुढचे सीन गाण्याचे करून घ्यायचे. या गाण्यासोबत माझ्या खूप जास्त आठवणी आहेत. मी एकाच साडीमध्ये गाण्याचे पूर्ण शूट केले आहे. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन हा प्रकारच नव्हता. आहे त्या परिस्थितीमध्ये शूटिंग पूर्ण करावे लागत होते.
विशेष म्हणजे आमच्या रिमझिम गिरे सावन या गाण्याचे शूटिंग सुरू असताना लोकांनी खूप गर्दी केली होती. मात्र, त्यांना हे माहिती नव्हते की, मौसमी चटर्जी आणि अमिताभ बच्चन हे शूटिंग करत आहेत. त्यावेळी अमिताभ बच्चन हे नवे असल्याने त्यांनी फार काही लोक ओळख नव्हते. मात्र, शूटिंगवेळी लोकांची गर्दी असायची. तब्बल दोन दिवस गाण्याचे शूटिंग सुरू होते.
पुढे मौसमी चैटर्जी म्हणाल्या की, आमचे रिमझिम गिरे सावन हे गाणे वेगवेगळ्या तीन ठिकाणी शूट करण्यात आलंय. विशेष म्हणजे हे तीनही ठिकाणी एकमेकांच्या जवळ आहेत. आज जर या जगामध्ये बासु चटर्जी असते आणि त्यांनी तो ठाण्यातील त्या जोडप्यांचा व्हिडीओ बघितला असता तर त्यांना खूप जास्त छान वाटले असते.