Pushpa The Rise Review : रश्मिकाच्या सौंदर्याने लागेल वेड, तर अल्लू अर्जुनच्या अ‍ॅक्शने होईल मनोरंजन!

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise Review) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. पुष्पा आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Pushpa The Rise Review : रश्मिकाच्या सौंदर्याने लागेल वेड, तर अल्लू अर्जुनच्या अ‍ॅक्शने होईल मनोरंजन!
पुष्पा : द राइज
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 3:05 PM

चित्रपट : पुष्पा द राईज स्टार

कलाकार : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहद फासिल

दिग्दर्शक : सुकुमार

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise Review) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. पुष्पा आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चंदनाच्या तस्करीवरील या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या आशा होत्या. हा चित्रपट लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे की नाही हे जाणून घेऊया…

काय आहे कथा?

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, पुष्पा राज (अल्लू अर्जुन) हा एक दुष्ट लाल चंदन तस्कर आहे, जो या दुष्ट चक्रामध्ये वेगाने वाढतो आहे. यादरम्यान त्याला पोलिस खात्याशीही सामना करावा लागतो. तिरुपतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटात रश्मिकाने अल्लू अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या तस्करीच्या कटाचे पुढे काय होते, यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

कसा आहे चित्रपट?

‘पुष्पा’विषयी सांगायचे की, तर हा चित्रपट अॅक्शन आणि संवादांनी परिपूर्ण आहे. अल्लू अर्जुन हा ‘वन मॅन आर्मी’ सारख्या चित्रपटातून सर्वांची मने जिंकताना दिसला आहे. त्याची बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी, अॅक्शन जबरदस्त आहे. चित्रपट पूर्ण त्याच्या अ‍ॅक्शनने भरलेला आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटाप्रमाणेच अॅक्शन सिक्वेन्सही धमाकेदार आहेत. अल्लू आणि रश्मिकाची प्रेमकहाणी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करते. विशेषत: मध्यांतरानंतरची काही दृश्ये अतिशय प्रेक्षणीय आहेत.

अभिनय

चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक खूपच वेगळा आहे. पण, ती लोकांच्या अपेक्षांवर खरी उतरताना दिसली आहे. अल्लू अर्जुन संपूर्ण चित्रपटात दमदार दिसला आहे. त्याची बॉडी, डायलॉग डिलिव्हरी आणि अॅक्शन खूपच लक्षणीय आहे. चित्रपटाच्या शेवटी फहद फासिलची एन्ट्री होते, पण त्याने अल्पावधीतच प्रेक्षकांवर आपला प्रभाव सोडला आहे.

का पहाल चित्रपट?

अल्लू अर्जुनचा अभिनय, लव्ह ट्रॅक, अॅक्शन सीन्स आणि फरादची एन्ट्री यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. अल्लू अर्जुनची बॉडी लँग्वेज खूपच शानदार दिसत आहे. अ‍ॅक्शनने भरलेला हा चित्रपट एकदा आवर्जून पाहावाच. अल्लू अर्जुन बर्‍याच दिवसांनी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच, या चित्रपटात एक नवीन जोडी पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.