प्रेक्षकांना आवडलाय विकी कौशलचा ‘सरदार उधम’, सोशल मीडियावर चाहते करतायत कौतुकाचा वर्षाव!
शूजित सरकार दिग्दर्शित 'सरदार उधम' चित्रपटात विकी कौशल उधम सिंहची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सुरुवातीला एका नाट्य प्रदर्शनासाठी बनवण्यात आला होता, परंतु आता तो डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला.
मुंबई : शूजित सरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम’ चित्रपटात विकी कौशल उधम सिंहची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सुरुवातीला एका नाट्य प्रदर्शनासाठी बनवण्यात आला होता, परंतु आता तो डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक शुजित सरकार यांनी भारतीय स्वातंत्र्य सेनानींच्या इतिहासाबद्दल बोलताना सांगितले की, “मी शहीद भगतसिंगांचे खूप अनुसरण करायचो आणि नंतर मी सरदार उधम सिंह यांचे अनुसरण केले. माझ्यातर्फे त्यांना लोकांशी संवाद साधायचा होता, आत ते थेट लोकांपर्यंत पोहोचले आहेत. एका कट्टर सुपरहिरो स्वातंत्र्य सेनानीच्या मंचावर त्याची कथा एकप्रकारे थांबली आहे.”
उधम सिंगच्या ध्येय आणि दृष्टीबद्दल बोलताना दिग्दर्शक शूजित सरकार म्हणाले, त्यांच्याकडे बरेच फोटो नाहीत. त्याच्याकडे एकूण 5 ते 6 फोटो आहेत. मात्र, प्रेक्षकांना हे सरदार उधम खूप आवडले आहे. जिथे लोकांनी विकीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. यासोबतच दिग्दर्शनानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकांनी ट्विटरवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत अनेक कमेंट्स केल्या आहेत.
पाहा चाहते काय म्हणतायत…
#SardarUdham ✊? what class film and a film for class filmy goers, Vicky is following footprints of imran Khan in bollywood. Such a gem. Look at his films and line-ups, OG superstar @vickykaushal09 pic.twitter.com/NlPLPTAG8a
— ManU (@Manusharps) October 15, 2021
Had expected so much more from #SardarUdham, unnecessarily long and doesnt capture the sentiment of freedom struggle very well. Probably #LegendOfBhagatSingh has set such standards which are difficult to match. Despite the slow script, Vicky Kaushal does a great job!
— Aaditya भारत (བྷཱ་རཏ) Tiwari (@aadityahbti) October 15, 2021
What a brilliant film made by #ShoojitSircar on a revolutionary #SardarUdhamSingh . Jallianwala Bagh masaccare scene had me in goosebump. It’s bold and emotional. @vickykaushal09 is outstanding (as always) in titular role. Film streaming on @PrimeVideoIN .
— Neeti Roy (@neetiroy) October 15, 2021
Years of hard-work. It shows. So many details. A long movie but authentic and true. This was needed. This movie will be cemented in the history of Indian films. @vickykaushal09 @ronnielahiri #SardarUdham #SardarUdhamOnPrime #VickyKaushal
— Pri (@Pri28293888) October 15, 2021
What amazing geniuses Shoojit Sircar and @vickykaushal09 are. Awestruck by this masterpiece #SardarUdham . Dussehra just got whole lot special. ?
— Kartikeya Pandey (@the_kp_factor) October 15, 2021
सरदार उधम
‘सरदार उधम’ मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो एका स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारत आहे. Amazon Prime Video वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये विकी कौशल सरदार उधम यांची भूमिका साकारत आहे. ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घातल्या होत्या. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.
‘सरदार उधम’ हा एका स्वातंत्र्य सेनानीचा बायोपिक आहे. सरदार उधम यांच्या जीवनाची कथा या चित्रपटात सांगितली गेली आहे, जी नक्कीच जाणून घेण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत. ‘सरदार उधम’ हा एक चित्रपट आहे, जो तुम्हाला संपूर्ण वेळ खिळवून ठेवेल. चित्रपटाच्या शेवटच्या तासात तुम्ही जनरल डायरचा तिरस्कार करू लागता. कारण, तुम्ही चित्रपटात इतके रमता की, तुम्हाला ती पात्रे जाणवू लागतात. हा एक पिरीयड बायोपिक आहे जो बॉलिवूडमध्ये बनवलेल्या उर्वरित चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.
हेही वाचा :
हेमा मालिनी ते दिया मिर्झा, पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्रींवर लागलाय ‘सावत्र आई’चा टॅग…