Bhoot Police Twitter Review : कॉमेडीचा तडका असूनही चित्रपट हरवल्यासारखा, पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘भूत पोलीस’?

कंगनाच्या ‘थलायवी’ व्यतिरिक्त सैफ आली खान आणि अर्जुन कपूर यांचा ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) हा चित्रपट आज चाहत्यांसमोर सादर केला जात आहे. सैफ अली खान, यामी गौतम, अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा चित्रपट ‘भूत पोलीस’ हा चित्रपट थिएटर्सऐवजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

Bhoot Police Twitter Review : कॉमेडीचा तडका असूनही चित्रपट हरवल्यासारखा, पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘भूत पोलीस’?
Bhoot Police
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 12:02 PM

मुंबई : कंगनाच्या ‘थलायवी’ व्यतिरिक्त सैफ आली खान आणि अर्जुन कपूर यांचा ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) हा चित्रपट आज चाहत्यांसमोर सादर केला जात आहे. सैफ अली खान, यामी गौतम, अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा चित्रपट ‘भूत पोलीस’ हा चित्रपट थिएटर्सऐवजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

‘भूत पोलीस’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी सादर केला जात आहे. या आधी हा चित्रपट 17 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता, परंतु शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलून, तो आजच्या तारखेला रिलीज केला.

सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

हा चित्रपट ओटीटीवर सादर करण्यात आला असताना, वापरकर्ते सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यावरून हे इतके स्पष्ट दिसत आहे की, प्रेक्षकांना चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या, तो त्या पूर्ण करू शकल्या नाहीत.

सोशल मीडियावर ट्विट करून युजर्स म्हणत आहेत की, चित्रपटात काही विशेष नाही. तर अभिनयाच्या बाबतीत, लोकांनी सैफ अली खान आणि जॅकलिनचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. वापरकर्त्यांच्या मते, अर्जुन कपूरचा अभिनय निराशाजनक आहे. तर, काही लोक म्हणतात की, चित्रपटाची कथा चांगली आहे पण ती योग्यरित्या सादर केली गेली नाही.

पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा :

गप्पांच्या ओघात शाहीर शेखने जाहीर केली अंकिता लोखंडेची ‘ती’ खाजगी गोष्ट, ऐकून चाहतेही झाले उत्सुक!

मराठी मालिकांमध्येही रंगणार गणेशोत्सव, कलाकारांवर चढणार सणाच्या आनंदाचा रंग!