Bhuj Short Review | अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट…

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ (Bhuj The Pride Of India) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Bhuj Short Review | अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट...
भुज
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 12:38 PM

चित्रपट : ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’

स्टार कास्ट : अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, नोरा फतेही, एमी विर्क

दिग्दर्शक : अभिषेक दुधैया

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ (Bhuj The Pride Of India) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जर, तुम्ही देखील हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर, आधी हा शॉर्ट रिव्ह्यू…

कशी आहे चित्रपटाची कथा?

‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ची कथा 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये त्या वेळी भुज विमानतळाचे प्रभारी असलेले आयएएफ स्कॅड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी 300 स्थानिक महिलांच्या मदतीने एअरबेसची पुनर्बांधणी केली होती. 1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले. पाकिस्तानने 14 दिवसात भुज विमानतळावर 35 वेळा 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला केला होता. युद्धाच्या वेळी शत्रूने हवाई तळ नष्ट केले. त्यानंतर विजय, जवळच्या माधापूर गावातील 300 महिलांसह, भारतीय हवाई दलाचे विमान उतरू शकेल म्हणून एक हवाई तळ तयार केला होता. या चित्रपटात हवाई दलाची शक्ती आणि पराक्रम दाखवण्यात येणार आहे.

कसा आहे चित्रपट?

चित्रपटाच्या डिस्क्लेमरमध्ये लिहिल्याप्रमाणे, चित्रपटाची काल्पनिक कथा असून, सत्य घटनांवर आधारित आहे. पूर्वार्धात अनेक पात्रांचे कॅमिओ आहेत, ज्यात शौर्याचे भाषण दिले जाते. त्यात भुज एअरबेसवरील हल्ला दाखवला आहे. उत्तरार्धाच्या भागात हा चित्रपट अधिक रंजक होतो. हा चित्रपट तुम्हाला संपूर्ण वेळ खुर्चीला खिळवून ठेवेल हे नक्की! चित्रपट अॅक्शन आणि मनोरंजनाने परिपूर्ण आहे. यातील हवाई लढाईची दृश्ये देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. चित्रपटातील व्हीएफएक्सचे काम चांगले आहे.

कलाकारांचा अभिनय

अजय देवगण त्याच्या पात्रामध्ये इतका परिपूर्ण वाटला आहे की, त्याच्याशिवाय इतर कोणीही हे सीन करू शकले नसते. संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर आणि एमी विर्क यांनीही चांगले काम केले आहे. कॅमिओमध्ये नवनी परिहार माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली आहे.

कुठे कमी पडतो चित्रपट?

जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा त्याच्या नायकाला कथन करावी लागते, तेव्हा स्क्रिप्टचा कमकुवतपणा असल्यासारखे वाटते. चित्रपटाच्या पहिल्या चाळीस मिनिटांत, दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचेय हे समजत नाही आणि चित्रपट थोडासा भरकटत जातो. भुज एअरस्ट्रीपचा मूळ कथानक ज्यावर चित्रपट आधारित आहे, तो भाग चित्रपटाच्या शेवटच्या चाळीस मिनिटांत आहे. यामुळे मूळ कथेकडे येईपर्यंत चित्रपट खूप रटाळ वाटायला लागतो. मात्र, काही अॅक्शन सिक्वेन्समुळे चित्रपट पाहावासा वाटतो.

का पाहाल चित्रपट?

जर, तुम्हाला देशभक्तीपर चित्रपट आवडत असतील तर, हा चित्रपट तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि तुम्ही हा चित्रपट कुटुंबासह देखील पाहू शकता.

हेही वाचा :

‘कैसे हो देवी और सज्जनो…’ पुन्हा एकदा कानी पडणार, ‘या’ दिवशी KBC प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोलमडून गेले शम्मी कपूर, दुसरे लग्न करण्यापूर्वी घातली ‘ही’ अट!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.