Aarya Season 2 Review | तिसऱ्या सीझनची वाट पाहायला लावणारा ‘आर्या 2’, सुष्मिता सेनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने जिंकलं प्रेक्षकांचं मन!

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 'आर्या' (Aarya 2) या सीरीजद्वारे डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्यात अभिनेत्री यशस्वी ठरली. 'आर्या'चा पहिला सीझन खूपच धमाकेदार होता, त्यानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.

Aarya Season 2 Review | तिसऱ्या सीझनची वाट पाहायला लावणारा ‘आर्या 2’, सुष्मिता सेनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने जिंकलं प्रेक्षकांचं मन!
Aarya 2
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 5:33 PM

कलाकार : सुष्मिता सेन, अंकुर भाटिया, जयंत कृपलानी, विकास कुमार, विश्वजित प्रधान, सिकंदर खेर, सुगंधा गर्ग

दिग्दर्शक : राम माधवानी

प्लॅटफॉर्म : डिस्ने प्लस हॉटस्टार

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘आर्या’ (Aarya 2) या सीरीजद्वारे डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्यात अभिनेत्री यशस्वी ठरली. ‘आर्या’चा पहिला सीझन खूपच धमाकेदार होता, त्यानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आज (10 डिसेंबर) ‘आर्या’चा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. यात एकूण 8 भाग आहेत. ‘आर्या 2’ ची कथा तिथूनच सुरू होते, जिथे पहिला सीझन संपला होता.

काय आहे कथा?

‘आर्या सीझन 2’ तिथून सुरू होतो, जेव्हा सुष्मिता तिच्या मुलांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेते. पण तिथेही ते सुरक्षित नाहीत. नंतर, वडिलांविरुद्ध साक्ष देण्यासाठी आणि सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन देत आर्याला भारतात आणले जाते. मात्र, आर्याने कोर्टात केलेल्या आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली. त्यामुळे पोलीस आयुक्त तिला मदत करण्यास नकार देतात.  तर, रशियन माफियाही आर्याच्या मागे लागतात, कारण त्यांना वाटते की आर्यकडे 300 कोटींच्या ड्रग्ज चोरीची माहिती आहे. पण ती तिने लपवून ठेवली आहे. एकीकडे त्याचे कुटुंब आर्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे रशियन माफियाही तिला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत ती आपल्या कुटुंबाशी कशी भांडणार आणि आपल्या तीन मुलांना कशी वाचवणार, याच वळणावर हा सीझन संपतो.

बरेच ट्विस्ट्स आणि टर्न!

दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता म्हणजेच आर्या हळूहळू सर्व कमांड आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेते. सुष्मिताने या सीझनमध्ये दमदार अभिनय केला आहे. आपल्या व्यक्तिरेखेतील कमकुवतपणा आणि ताकद तिने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे. जसजशी कथा पुढे जाईल तसतसे लोकांना बरेच ट्विस्ट्स पाहायला मिळतील. मात्र, सस्पेन्स जसजसा उघडेल, तसतशी लोकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. सीरीजची स्क्रिप्ट खूप छान लिहिली आहे. कथा पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.

‘कमज़ोर हम नही, वक्त होता है’ सुष्मिताचे असे काही डायलॉग्स जबरदस्त आहेत. याशिवाय ‘मै डॉन नही हूं, मै बस एक वर्किंग मदर हूं’.  या सीरीजमध्ये सुष्मिताही दमदार स्टंट करताना दिसत आहे. याशिवाय बाकीच्या पात्रांनीही छान काम केले आहे. मात्र, मालिकेच्या शेवटच्या भागात तुम्हाला काही प्रश्न पडतील, ज्यासाठी तुम्हाला तिसर्‍या सीझनची वाट पाहावी लागेल. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे सुष्मिताचा दमदार परफॉर्मन्स आणि सीरीजचा क्लायमॅक्स दोन्ही पाहण्यासारखे आहेत.

हेही वाचा :

आम्हीही आंतरजातीय विवाह केला, तरीही तू स्वीकारलंस! मग कीर्तीच्या आईला का नाही जमलं?, अभिनेत्रीची पोस्ट होतेय व्हायरल!

Urfi Javed | निळ्या बिकिनीमध्ये उर्फी जावेदने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटो पाहून चाहते म्हणतायत…

Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल…’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....